Nashik News : मातेच्या अंतिम दर्शनासाठी ‘ऑक्सिजन’वरील पुत्राची स्मशानभूमीत धाव! निवाणेत मातृप्रेमाचे दर्शन

Nashik News : कळवण तालुक्यातील निवाणे या छोट्याशा खेड्यातील एका पुत्राने घडविलेले मातृप्रेमाचे आगळेवेगळे दर्शन अचंबित करणारे आहे.
For his mother's final darshan, he came from the ICU without caring about his own life.
For his mother's final darshan, he came from the ICU without caring about his own life.esakal
Updated on

Nashik News : वृद्धापकाळात जन्मदात्या आई-वडिलांची सेवा न करणारे तसेच अंत्यसंस्काराकडे पाठ फिरविणाऱ्या अनेक कृतघ्न मुलांच्या कहाण्या आपण ऐकलेल्या असताना कळवण तालुक्यातील निवाणे या छोट्याशा खेड्यातील एका पुत्राने घडविलेले मातृप्रेमाचे आगळेवेगळे दर्शन अचंबित करणारे आहे. (son on Oxygen runs to cemetery for his mother last darshan)

मातृछत्र हरपल्याची वार्ता कानी पडताच नाशिकच्या रुग्णालयात कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या या मुलाने नाकाला ऑक्सिजनच्या नळ्या आणि व्हीलचेअरवर बसलेल्या अवस्थेत थेट स्मशानभूमीत धाव घेतली आणि चितेला अग्निडाग देत आईची अंतिम इच्छा पूर्ण केली. निवाणे येथील समाधान (बापू) शिवमन आहेर यांचा कॅन्सरशी लढा सुरू होता.

गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुणे येथील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये समाधान दाखल होते. त्यांच्या या आजाराची माहिती मिळाल्याने ८२ वर्षीय आई सुमनबाई शिवमण आहेर यांना तीव्र धक्का बसला. तब्येत अजून खालावली व त्यातच त्यांचे निधन झाले. आई निवर्तल्याचा निरोप मिळताच समाधानचा जीव कासावीस झाला.

कधी एकदाचे आईचे दर्शन घेतो, यासाठी तगमग सुरू झाली. डॉक्टर, नातेवाईक, आप्तेष्ट, बहिणींनी ‘तू येऊ नको, तुझी तब्येत अतिशय गंभीर आहे. अंत्यविधीसाठी आला तर तब्येत अधिक खराब होऊ शकते’ अशा सूचना दिल्या; परंतु आईची शेवटची भेट व एकुलत्या मुलाच्या हाताने अग्निडाग मिळावा ही आईची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, असे समाधानचे म्हणणे होते. (latest marathi news)

For his mother's final darshan, he came from the ICU without caring about his own life.
Nashik Tourist Places : विकेण्ड पावसाळी पर्यटनावर पोलिसांकडून निर्बंध! भावली, गंगापूर धरणासह त्र्यंबक परिसरात बंदोबस्त लावणार

आईच्या शेवटच्या भेटीसाठी आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर असताना समाधान आहेर यांनी नाशिक येथील सुधर्म हॉस्पिटलमधील डॉ. मुर्तडक, डॉ. महेंद्र आहेर यांना व त्यांच्या वैद्यकीय चमूला खूप विनंती व भावनिक साद घातली. त्यांच्या या आर्त हाकेपुढे डॉक्टरही भावनिक झाले. त्यांनी स्वतः डॉक्टर व मेडिकल स्टाफ सोबत घेत फक्त दर्शनासाठी वेळ दिला.

समाधान आहेर यांनी व्हीलचेअरवर बसूनच मेडिकल इमर्जन्सी इक्विपमेंटसह निवाणे येथे येऊन आईचे अंतिम दर्शन घेतले व व्हीलचेअरद्वारे फेरी घेऊन अग्निडाग दिला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तत्काळ पुन्हा रुग्णालयात दाखल केले. ते दृश्‍य पाहून उपस्थितांचे हृदय हेलावले होते.

आईच्या अंतिम दर्शनासाठी व तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अंत्यसमयी हजेरी लावणाऱ्या समाधान आहेर यांचे हे बोलके उदाहरण माता-पित्यांकडे पाठ फिरविणाऱ्या मुलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले.

For his mother's final darshan, he came from the ICU without caring about his own life.
Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.