Nashik Bytco Hospital : डॉक्टर नसल्यामुळे ‘बिटकोत’ सोनोग्राफी बंद! गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड; खासगी रुग्णालयात धाव

Latest Nashik News : डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये जाऊन सोनोग्राफी करावी लागत आहे. अनेक दिवसांपासून हा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे.
Bytco Hospital at Nashik Road.
Bytco Hospital at Nashik Road.esakal
Updated on

नाशिक रोड : येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशिन सुरू आहे. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये जाऊन सोनोग्राफी करावी लागत आहे. अनेक दिवसांपासून हा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. (sonography closed due to lack of doctors at Bytco hospital)

नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये तीस ते पस्तीस खेड्यांमधील आणि महापालिका हद्दीमध्ये राहणारे रुग्ण उपचार घेण्यास येतात. या रुग्णालयाची खासियत म्हणजे कोविडकाळात सर्वाधिक रुग्णांना जगवणारे हॉस्पिटल म्हणून गौरव केला गेला आहे. रुग्णांनी येथील डॉक्टरांवर शाबासकीची थाप दिलेली आहे.

मात्र सध्या या रुग्णालयात सोनोग्राफी करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसून येथील रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी करावी लागत आहे. पर्यायाने गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. नाशिक महापालिकेने अनेक वेळा डॉक्टर भरतीच्या जाहिराती दिल्या आहेत.

मात्र हे पद ठेकेदारी पद्धतीने असल्यामुळे या पदावर काम करायला डॉक्टर तयार होत नाही. नाशिक महापालिकेने रुग्णालयात सोनोग्राफी करणारे तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करावे, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे. महिला रुग्णांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (latest marathi news)

Bytco Hospital at Nashik Road.
Nashik News : निफाडला खड्ड्‌यात बसून ‘प्रहार’चे आंदोलन! खड्ड्‌यांमुळे ट्रॅक्टर उलटून कांदे रस्त्यावर; शेतकऱ्याचे नुकसान

याशिवाय त्वचारोगतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांची या रुग्णालयाला गरज असून २०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये अधिक कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. अधिक कर्मचारी नियुक्त असल्यास रुग्णांना दर्जात्मक आणि गुणात्मक सेवा मिळू शकते.

"डॉक्टर भरतीच्या जाहिराती महापालिकेने तीन वेळा दिल्या, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एक लाख १० हजार रुपये महिन्याला मानधन देऊन सुद्धा डॉक्टर उपलब्ध होत नाही."

- डॉ. जितेंद्र धनेश्वर, बिटको हॉस्पिटल

Bytco Hospital at Nashik Road.
Nashik News : लासलगावच्या शिवनदीचा श्‍वास गुदमरला! घाणीच्या साम्राज्यमुळे नदी बनली अक्षरश: कचराकुंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.