नाशिक : तृणधान्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारच्या आयसीएआर-आयआयएमआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च)तर्फे दर वर्षी देण्यात येणारा ‘पोषक अनाज ॲवॉर्ड’ सलग तिसऱ्या वर्षी नाशिकची प्रसिद्ध ‘सोनपरी’ भगरीला जाहीर झाला आहे. यंदा ‘इअर टू इअर ग्रोथ’ या गटात पुरस्कार जाहीर झाला असून, शनिवारी (ता. १९) हैदराबाद येथे वितरण होणार आहे. जागतिक पातळीवरून तृणधान्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. (Sonpari Bakri receives Poshak Anaj Award for third consecutive year )