नाशिक : मॉन्सूनोत्तर पाऊस थांबल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या पेरणीला प्रारंभ केला आहे. यंदा या हंगामात जिल्ह्यात एक लाख ११ हजार ७८० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, आतापर्यंत केवळ एक हजार १४० हेक्टर (एक टक्का) क्षेत्रावर ज्वारी, गहू, मका व हरभऱ्याची पेरणी झाली आहे. तसेच, खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली. काढणी झाल्यावर पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात साधारणतः कांदा पिकासह तीन लाख ३६ हजार ५६० हेक्टरवर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. (Sowing of Rabi on 1140 hectares in district Harvesting of Kharif season crops)