नाशिक : इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉल सिग्नलकडे जाणार्या पोलीस गस्त वाहनाला (पेट्रोलिंग पीटर मोबाईल व्हॅन) भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये कारचालकासह पोलिस गस्त वाहनातील उपनिरीक्षकासह अंमलदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरील गस्त वाहन हे मुंबई नाका पोलिस ठाण्याचे होते. ( car collided with police patrol vehicle sub inspector )