Nashik NMC News : नाशिककरांचा मतदानाचा टकका वाढवण्यासाठी रंग रेषांचा आविष्कार

Nashik News : नाशिक महानगरपालिका व क्रेडाई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Painting competition
Painting competitionesakal
Updated on

Nashik News : नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्वीप उपक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. या पार्श्वभूमी नाशिक महानगरपालिका व क्रेडाई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत २३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जतिन रहेमान (भा. प्र.से), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अमिशा मित्तल, स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी स्मिता झगडे ,उपायुक्त डॉ.मयूर पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शोभा पुजारी.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार राजेश सावंत, विभागीय अधिकारी राजाराम जाधव,योगेश रकटे,मदन हरिश्चंद्र, तुषार आहेर, सुनीता कुमावत, कैलास दराडे, नितीन गंभीरे, उद्यान विभागाचे उद्यान निरीक्षक आदी प्रमुख मान्यवर या स्पर्धेच्या कार्यक्रमास उपस्थित होते.

मतांची टक्केवारी वाढीसाठी आवाहन करावे:-जतिन रहेमान

स्वीप उपक्रमा अंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत बोलताना उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जतिन रहेमान(भा. प्र.से) यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांनी आपले पालक,नातेवाईक व आप्तेष्ट तसेच शेजारील रहिवाशी यांना मतदानाबद्दल जागृत करून मतदान करण्याचे आवाहन करावे तसेच मतांची टक्केवारी वाढीसाठी मदत करावी. आपण निवडणुकीच्या विषयाशी निगडित उत्कृष्ट चित्र काढण्यासाठी सहभाग नोंदविला त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मतदान आपला अधिकार- मित्तल

मतदान हा आपला अधिकार आहे तो आपण बजावला पाहिजे त्याबाबत आपल्या सर्वांच्या माध्यमातून उत्तम अशी मतदान करण्याबाबत जनजागृती करावी व २० मे २०२४ ला मतदान करण्याचे आवाहन आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अमिशा मित्तल यांनी केले. (latest marathi news)

Painting competition
Nashik NMC News : मनपाची ऑनलाइन सेवा विस्कळित! 8 तासानंतरही सर्व्हर डाऊन

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अमिषा मित्तल यांनी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी स्मिता झगडे व अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित स्पर्धकांची व पालकांशी संवाद साधला व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रेडाईच्या वतीने चित्र काढण्यासाठी दिलेल्या साहित्याचे किट विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलेल्या संदीप पांडे, सुधीर फडके,संदीप पवार, हंसराज ससले.

ज्योती सानप, विजय शिंदे, चित्रा,संधान, तुषार कट्यारे या कला शिक्षकांचा कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्यान विभाग घनकचरा व्यवस्थापन विभाग व मनपाच्या विविध विभागांनी परिश्रम घेतले.

रेखाटली आकर्षक चित्रे

स्वीप उपक्रमा अंतर्गत नाशिक महानगरपालिका व क्रेडाई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला स्पर्धेसाठी १)उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा २)मी निवडणार माझा खासदार ३)माझे मत माझी जबाबदारी ४)वोट कर नाशिककर हे विषय देण्यात आलेले होते. या विषयास अनुसरून लहानग्या पासून ते मोठ्या अश्या एकूण २३५ स्पर्धकांनी आकर्षक चित्रे या स्पर्धेत रेखाटली गेली.

Painting competition
Nashik Loksabha: नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युध्द; NCPचे पटेल म्हणतात, नाशिक आमचेच! सेनेचे शिरसाठ म्हणतात, आग्रह नव्हे, हट्ट!

सेल्फी पॉइंट वर फोटो घेण्याचा आनंद

या स्पर्धेच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आले होते. त्या सेल्फी पॉईंट वर विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी छायाचित्र काढण्यासाठी गर्दी केली व त्यांनी सेल्फी पॉईंटवर फोटो घेऊन आनंद घेतला.

कार्यक्रम स्थळी मॅस्काॅटच्या माध्यमातून जनजागृती

मॅस्काॅटच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी व परिसरात मॅस्काॅटच्याद्वारे जनजागृती करण्यात येत होती यावेळी उपस्थित स्पर्धक तसेच नागरिकांनी त्याच्याबरोबर छायाचित्र काढून आनंद घेतला.

मेहंदी स्पर्धा

स्वीप उपक्रमांतर्गत मनपाच्या वतीने सर्व विभागीय कार्यालयामध्ये गुरुवार दि.९ मे २०२४ रोजी महिलांसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षापुढील सर्व महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पूर्व विभागीय कार्यालय, पश्चिम विभागीय कार्यालय,पंचवटी विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय.

Painting competition
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

सातपूर विभागीय कार्यालय, नवीन नाशिक विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय या सहा विभागीय कार्यालयांमध्ये सायंकाळी ३.०० वाजेपासून स्पर्धकांची नोंदणी केली जाणार आहे.सायंकाळी ४ वाजेपासून या मेहंदी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मेहंदी स्पर्धेसाठी निवडणुकीची निगडित विषय निश्चित करणेत आले आहे.

त्यात १)भारत निवडणूक आयोगाचा लोगो २) स्वीप लोगो ३)वोटर ॲप हेल्पलाईनचा लोगो ४)सक्षम ॲप लोगो मतदार जनजागृती संदर्भातील विषय या मेंहदी स्पर्धेत असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे १४ मे २०२४ रोजी घोषित केली जाणार आहे.तरी या मेहंदी स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी स्मिता झगडे यांनी केले आहे.

Painting competition
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.