Nashik Jagannath Rathotsavas : श्री जगन्नाथ रथोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद; फटाक्यांच्या आतषबाजीसह जागोगाजी स्वागत

Jagannath Rathotsavas : श्री जगन्नाथ पुरी रथयात्रा उत्सव समितीच्यावतीने रविवारी (ता.७) शहरातून श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
Nashikkar participating in the Rath Yatra organized by Shri Jagannath Puri Rath Yatra Utsav Samiti, Divisional Commissioner Praveen Gedam, District Collector Jalaj Sharma pulling the chariot in the second photo.
Nashikkar participating in the Rath Yatra organized by Shri Jagannath Puri Rath Yatra Utsav Samiti, Divisional Commissioner Praveen Gedam, District Collector Jalaj Sharma pulling the chariot in the second photo.esakal
Updated on

Nashik Jagannath Rathotsavas : श्री जगन्नाथ पुरी रथयात्रा उत्सव समितीच्यावतीने रविवारी (ता.७) शहरातून श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात झाला. रथाचे जागोजागी सडारांगोळी व फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत स्वागत करण्यात आले. रथ उत्सवाचे हे दुसरे वर्ष होते. ओरिसातील पुरी येथे दरवर्षी श्री जगन्नाथ (श्रीकृष्ण), सुभद्रा व बलभद्र यांच्या रथोत्सवाचे भव्य आयोजन केले जाते. जुन्या आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात गतवर्षी श्री जगन्नाथांसह सुभद्रा व बलभद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ( Spontaneous response to Sri Jagannath Rathotsava )

या प्राणप्रतिष्ठेनंतर गतवर्षी प्रथमच शहरात जगन्नाथाच्या रथाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला. रथोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते. रथावर श्रींच्या पादुका, मूर्तींसह महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज, कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती आदी विराजमान झाले होते.

रथोत्सवात विविध आखाड्यांचे संत, महंत, महिला व पुरुष भाविक, माजी आमदार बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी नागरिक सहभागी झाले होते. सकाळी आठला सजविलेल्या रथाचे तपोवनातील आठवण लॉन्स येथून पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आगमन झाले. याठिकाणी मूर्तींची विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा झाल्यावर पूजन व आरती संपन्न झाली. त्यानंतर साडेदहाला रथोत्सवास सुरवात झाली.

त्यानंतर अडगाव नाका, गणेशवाडी, गाडगे महाराज पूर, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, सीता गुंफा, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, नागचौक, कृष्णनगरमार्गे रथोत्सव पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिराजवळ पोचल्यावर रथोत्सवाची समाप्ती झाली. रथोत्सवानिमित्त देवस्थानतर्फे आठवडाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. (latest marathi news)

Nashikkar participating in the Rath Yatra organized by Shri Jagannath Puri Rath Yatra Utsav Samiti, Divisional Commissioner Praveen Gedam, District Collector Jalaj Sharma pulling the chariot in the second photo.
Puri Jagannath Temple : परिक्रमा प्रकल्पामुळे जगन्नाथ मंदिराचा कायापालट; रथयात्रेचा मार्गही मोकळा

महिला पथकाचे नृत्य ठरले लक्षवेधी

रथोत्सवात श्री पंचमुखी हनुमान मंदिरातील महिला भाविकांचे पथक लक्षवेधी ठरले. या महिलांनी विविध गीतांवर ठेका धरत रथोत्साची रंगत वाढविली. या पथकात महिला व युवतींचा मोठा सहभाग होता. रथ ओढण्यासाठी महिला व पुरूषांची दोन स्वतंत्र पथके तैनात होती.

रथोत्सवाचे जागोजागी विविध मंडळांतर्फे स्वागत.

राजकीय पदाधिकाऱ्यांसह अधिकारी सहभागी.

रथोत्सवात इस्कॉन, गोपीनाथ गौंडिया मठ आदींचा सहभाग.

महिला पथक, धर्मध्वज पथकाने वेधले लक्ष.

रथ ओढण्यासाठी प्रथमच महिला व पुरुषांचे स्वतंत्र पथक.

Nashikkar participating in the Rath Yatra organized by Shri Jagannath Puri Rath Yatra Utsav Samiti, Divisional Commissioner Praveen Gedam, District Collector Jalaj Sharma pulling the chariot in the second photo.
Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेला ७ जुलैपासून होणार सुरूवात, 1000 यज्ञांचे पुण्य देणाऱ्या यात्रेचे महत्त्व घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.