SSC 10th Result 2024 : उत्‍सुकता वाढली, दहावीचा उद्या निकाल

Nashik News : इयत्ता दहावीच्‍या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.२७) दुपारी एकला जाहीर होणार आहे. संकेतस्‍थळावर विद्यार्थ्यांना त्‍यांचा आसनक्रमांक व इतर तपशील दाखल करून निकाल पाहता येणार आहे.
SSC 10th Result 2024
SSC 10th Result 2024Sakal
Updated on

Nashik News : इयत्ता दहावीच्‍या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.२७) दुपारी एकला जाहीर होणार आहे. संकेतस्‍थळावर विद्यार्थ्यांना त्‍यांचा आसनक्रमांक व इतर तपशील दाखल करून निकाल पाहता येणार आहे. निकालाच्‍या तारखेची घोषणा झाली असल्‍याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्‍साह बघायला मिळतो आहे. (SSC 10th result tomorrow)

यापूर्वीच्‍या टप्यांत विविध शिक्षण मंडळांचे दहावी व बारावीचे निकाल जाहीर झालेले आहेत. नुकताच महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर केला होता. यानंतर इयत्ता दहावीच्‍या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून होती.

शिक्षण मंडळाने निकालाच्‍या तारखेची घोषणा केली असून, सोमवारी (ता.२७) निकाल घोषित होईल. विद्यार्थ्यांना बेस्‍ट ऑफ फाइव्ह पद्धतीने टक्‍केवारी प्रदर्शित केली जाणार आहे. दरम्‍यान निकालाविषयी विद्यार्थ्यांसह त्‍यांच्‍या पालकांमध्येही उत्‍सुकतेचे वातावरण बघायला मिळते आहे. विद्यार्थ्यांना त्‍यांचे स्‍मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्‍प्‍युटरवर निकाल पाहता येणार आहे.

गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी मंगळवारपासून अर्जाची संधी

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्‍या छायाप्रती, पुनर्मुल्‍यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना स्‍वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सुविधा उपलब्‍ध असेल. (latest marathi news)

SSC 10th Result 2024
Nashik Agriculture News : खरिपात कांद्यासह मका, सोयाबीनचा बोलबाला; येवल्यात पांढरे सोनं, बाजरी घटणार

गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार (ता.२८) पासून ११ जूनपर्यंत मुदत असेल. तर जुलै-ऑगस्‍ट महिन्‍यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना ३१ मेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

या संकेतस्थळावर पहा निकाल-

https://mahresult.nic.in

https://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

SSC 10th Result 2024
Nashik Police Promotion : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपनिरीक्षकपदी बढती! सुखद धक्का; शहर आयुक्तालयातील 5 जणांचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com