SSC Exam 2024 : दहावीची आजपासून परीक्षा, पहिला पेपर मराठीचा

SSC Exam 2024 : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्‍या परीक्षेला शुक्रवार (ता. १)पासून सुरवात होत आहे.
SSC Exam
SSC Examesakal
Updated on

SSC Exam 2024 : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्‍या परीक्षेला शुक्रवार (ता. १)पासून सुरवात होत आहे. बारावीप्रमाणे दहावीच्‍या परीक्षेतही शेवटी अतिरिक्‍त दहा मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना मिळेल. दरम्‍यान, पहिल्‍या दिवशी मराठीसह इतर प्रथम भाषा विषयांची लेखी परीक्षा पहिल्‍या सत्रात होणार आहे. या परीक्षेला नाशिकमधून दोन लाख ५९ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ()

गेल्‍या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची लगबग पाहायला मिळत होती. शाळांमध्ये निरोप समारंभ व इतर सोहळे पार पडल्यावर विद्यार्थी परीक्षेच्‍या तयारीला लागले होते. अनेक विद्यार्थ्यांकडून अभ्यास पूर्ण करताना विषयांची उजळणी केली जात होती. अखेर शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार लेखी परीक्षांना सुरवात होत आहे.

शुक्रवारपासून या लेखी परीक्षा पार पडणार आहेत. प्रमुख विषयांच्‍या परीक्षा सकाळ सत्रात घेतल्‍या जातील. काही विषयांचे पेपर हे दुपारच्‍या सत्रात पार पडणार आहेत. सकाळ सत्रातील परीक्षेची वेळ अकराची असून, त्‍याच्‍या अर्धा तास आधी सकाळी साडेदहाला विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहणे बंधनकारक असणार आहे. परीक्षेच्‍या अनुषंगाने महत्त्वाच्‍या सूचना प्रवेशपत्रावर दिलेल्‍या आहेत.

तणाव टाळण्यासाठी खंड

शिक्षण मंडळाने सूचना जारी केल्‍या आहेत. त्‍यानुसार विद्यार्थ्यांच्‍या मनावरील ताण कमी होण्याच्‍या दृष्टीने मार्च २०२४ च्‍या परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले. या परीक्षेदरम्‍यान बहुतांश विषयांच्‍या पेपरमध्ये खंड ठेवलेला आहे. ही परीक्षा २६ मार्चपर्यंत चालेल.

SSC Exam
SSC-HSC Exam 2024 : दहावी, बारावीच्‍या परीक्षेला मिळणार अतिरिक्‍त 10 मिनिटे

आंदोलनाचे ठरणार आव्‍हान

माकपने पुकारलेल्‍या आंदोलनामुळे सध्या आंदोलनकर्त्यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात ठाण मांडलेले आहे. यामुळे त्र्यंबक नाका सिग्‍नल ते अशोक स्‍तंभ या दरम्‍यानची वाहतूक विस्कळित झालेली आहे. या मार्गावर आदर्श विद्यालय, बिटको विद्यालय, शासकीय कन्‍या शाळा, रुंग्ठा हायस्‍कूल अशा विविध शाळा आहेत.

याशिवाय, जुने नाशिक व गंगापूर भागातील शाळांकडे जाण्यासाठी पालक वर्गाकडून या मार्गाचा अवलंब केला जात असतो. दहावीच्‍या लेखी परीक्षांना सुरवात होत असताना आंदोलनामुळे ठप्प झालेली वाहतूक आव्‍हानात्‍मक ठरणार आहे.

काही महत्त्वाच्‍या सूचना अशा ः

- परीक्षेच्‍या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे

- गेल् ‍यावर्षीप्रमाणे पेपरच्‍या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून दिलेले आहेत

- कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्गाशी लढा’ अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आखला

- परीक्षा केंद्रांवर विविध पथकांची नियुक्‍ती केली असून, त्‍यांच्‍याकडून कारवाई केली जाणार आहे

- परीक्षा केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्‍त तैनात केलेला आहे (latest marathi news)

SSC Exam
SSC-HSC Exam 2024 : बारावीचे 48 हजार तर दहावीचे 57 हजार परिक्षार्थी; 21 फेब्रुवारीपासून परिक्षा

जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या अशी ः

जिल्हा विद्यार्थी संख्या

नाशिक ९३ हजार ९०९

जळगाव ५७ हजार ०५८

धुळे २८ हजार ६४५

नंदुरबार २० हजार ९६७

एकूण २ लाख ५७९

SSC Exam
SSC HSC Exam 2024 : दहावी- बारावीच्या परिक्षेवरील बहिष्कार मागे !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.