Nashik News : सटाणा शहर वळण रस्ता की उड्डाणपूल? दुतर्फा अतिक्रमणामुळे मार्ग बनला मृत्यूचा सापळा

Nashik News : सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी राज्य महामार्गाचे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले काँक्रिटीकरणाचे काम, दुभाजकाची झालेली दुरावस्था.
traffic jam on the national highway passing through the city.
traffic jam on the national highway passing through the city. esakal
Updated on

Nashik News : सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी राज्य महामार्गाचे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले काँक्रिटीकरणाचे काम, दुभाजकाची झालेली दुरावस्था, महामार्गाच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहतूक कोंडीमुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सटाणा वळण रस्त्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (stalled work of Sakri Shirdi state highway passing through satana town)

बायपास करा किंवा उड्डाणपूल करा मात्र बागलाणवासियांना दिलासा द्या, अशी एकमुखी मागणी केली जात आहे. बायपास झाला तर त्यावरुन जाणारी वाहने तशीही शहरातून जाणारच नाहीत. उड्डाणपुल झाला तरीही त्यावरुन जाणारी वाहने शहरातून फक्त जातांना दिसतील पण त्यांचा सटाणा शहराशी थेट संबध येणार नाही.

उड्डाणपूल झाला तर वडाळीभोईचे उदाहरण देत दिशाभूल केली जाते. पूर्वी वडाळीभोईला रस्त्याच्या दुतर्फा दहा ते बारा चहा व नाश्त्याची दुकाने होती. बाकी व्यापारी प्रतिष्ठाने म्हणून फारसे काही नव्हतेच. उड्डाणपूल झाल्यानंतर त्या हॉटेल्स तेवढ्या तेथून सोग्रस फाट्यालगत स्थलांतरीत झाल्या, यापेक्षा वेगळा असा काही परिणाम झाला नाही.

त्या उड्डाणपुलाच्या डिझाईनमधे एक दोष आहे, पुलाच्या पूर्ण लांबीमधे फक्त २ ठिकाणी बोगदे सोडून पूर्ण भरीव पूल केल्यामुळे वडाळीभोईचे विभाजन झाले. सटाणा शहरातील वाहतूक दररोज ठप्प होते. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून तब्बल तास- दीडतास श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारफाटा शिवतीर्थावर चारही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे चारही बाजूला दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. (latest marathi news)

traffic jam on the national highway passing through the city.
Nashik City Transport : अवजड वाहन वाहतुकीत बदलास महिनाभराची मुदतवाढ; सुधारित अधिसूचना 3 जूनपर्यंत बदल लागू

नाशिक, पुणे, मुंबईसारखा वरुनही रस्ता आणि खालूनही रस्ता अशा डिझाईनचा उड्डाणपुल वडाळीभोईला असता तर गावचे दोन तुकडे झालेच नसते आणि उड्डाणपुलाची भितीही सटाणा शहरवासीयांना वाटली नसती. कोणताही ट्रकचालक सटाणा शहर हद्दीत थांबून कधीही खरेदी-विक्री करीत नव्हताच. त्याची खरेदी चहा व नाश्‍त्याशिवाय इतर काहीच नाही.

आता ट्राफीकमुळे तो चहा व नाश्‍त्यालाही थांबू शकत नाही. त्यामुळे सटाण्याच्या आर्थिक उलाढालीत उड्डाणपूल झाला तरीही काहीच फरक पडणार नाही. सटाणा शहर बायपास झाला तर, त्या बायपासच्या दुतर्फा भविष्यात विकास होईल आणि प्रदुषणही कमी होईल हे निश्‍चित. पण, गावातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले नाही तर शिर्डी, नांदगाव, येवल्याच्या तुलनेत सटाण्याची दिशा व दशा कुठल्या बाजूकडे चालली हेही समजून घेतले पाहिजे.

...तर वाहतूक होईल सुरळीत

आज आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण झालेच पाहिजे आणि बसस्थानकामागील ६० फुटी रोडदेखील सुरु करुन स्थानकाचे एक प्रवेशद्वार पूर्व बाजूलाही काढून सोबत लिंक रोडचे काम पूर्ण केल्यास तसेच चौगाव रोड खोलपांदीतून जाणारा व चौगांवरोड ते अजमेर सौंदाणे रोड यांना जोडणारा रस्ता जो शेतकीसंघ.

traffic jam on the national highway passing through the city.
Nashik News : रस्त्यास पडलेले भगदाड ठरतेय मृत्यूचा सापळा; 15 दिवसापासून प्रशासनाचे दुर्लक्ष

कब्रस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती, मारवाडी हौसिंगच्या उत्तर बाजूलगत जाणारा साठफुटी रोड त्या कामात येणाऱ्या अडथळ्यांना पास करून लवकर तयार करणे, टॅक्सी स्टॅण्ड ते भंगारवाडा लक्ष्मीनारायण ऑईल मिललगतचा जुना मालेगावरोड तयार केल्यामुळे संपुर्ण वाहतूक सुटसुटीत होईल.

रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण करणे, त्यानंतर उड्डाणपुल झाल्यास त्यावरुन अवजड वाहतूक निघून जाईल. खाली फक्त शहर वाहतूक राहील. शिवतीर्थ, बसस्थानक चौक, दोधेश्‍वर नाका या ३ ठिकाणी सिग्नलची व्यवस्था केली तर कमीत कमी खर्चात सर्व वाहतूक सुरळीत होईल.

traffic jam on the national highway passing through the city.
Nashik Lok Sabha Constituency : महायुती विरुध्द महाविकास आघाडीत प्रचार युध्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.