SAKAL Special: दिवसाची सुरवात करा सुंदर हास्याने..! 'सकाळ मैत्रीण मीट-अप’ मध्ये विविध हास्य क्लबच्या महिलांनी साधला संवाद

Nashik News : हास्य योगा हा दिवसभराचा ताण दूर करण्यासाठी रामबाण आणि मोफत उपचार असल्याचे रहस्य शहरातील विविध हास्य क्लबच्या महिला सदस्यांनी ‘ सकाळ मैत्रीण मीट- अप’ संवादात उलगडले.
Women members of the Laughter Club present at the 'Maithrin Meet-up' program at 'Sakaal' Satpur office.
Women members of the Laughter Club present at the 'Maithrin Meet-up' program at 'Sakaal' Satpur office.esakal
Updated on

नाशिक : हातातल्या मोबाईलमुळे माणूस एकवेळ व्हिडिओ बघून हसेल पण, शेजारी बसलेल्या माणसाशी हसणार नाही. या अशा परिस्थितीत हास्य योगा हा दिवसभराचा ताण दूर करण्यासाठी रामबाण आणि मोफत उपचार असल्याचे रहस्य शहरातील विविध हास्य क्लबच्या महिला सदस्यांनी ‘ सकाळ मैत्रीण मीट- अप’ संवादात उलगडले. (Nashik Sakal Maitrin Meet up women marathi news)

रविवारी (ता. १०) ‘सकाळ’ सातपूर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विविध हास्य क्लबच्या महिला सदस्यांनी ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांच्याशी स्वानुभव शेअर केले. हास्य योगाच्या माध्यमातून अनेक आजारपण दूर होऊन मधुमेहाची औषधे कायमची बंद झाली आहेत.

रोजच्या हास्य योगामुळे दिवसभर पुरेल एवढी ऊर्जा तर मिळते पण, दिवसभर टवटवीत गुलाबासाखे चेहऱ्यावरचे हास्य कायम राहते आणि सकारात्मक विचार करण्याची सवय जडते. शहराच्या विविध भागात आज हास्य क्लब सुरू आहेत. सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान महापालिकेचे उद्यान किंवा मैदानात मोफत हास्य योगा शिकविला जातो.

हास्य योगा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी नाहीतर प्रत्येक वयोगटासाठी महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक हास्य योगामध्ये संशोधन केले असल्याने आजारपण दूर करण्याचे काम हास्य योगात असल्याचे अनुभव या महिलांनी सांगितले. दरम्यान, डॉ. राहुल रनाळकर यांनी ‘सकाळ’मध्ये महिलांसाठी खास प्रसिद्ध होणाऱ्या मैत्रीण या विशेष पानाचा उल्लेख करत अध्यात्म, संगीत, प्राणायाम, सोलो ट्रीप, आयुर्वेद, बचतगट यासारखी विविध वैचारिक सदर असल्याचे सांगत क्लबच्या सदस्यांच्या ‘सकाळ’कडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेतल्या.

या वेळी डॉ. सुषमा दुगड, अश्विनी धोपावकर, रंजना तांबट, सुरेखा तांबट, लीला तांबट, साधना चव्हाण, स्वप्नीला पंडित, नूतन परांजपे, सुमन वाघ, शोभा खोत, पल्लवी चौधरी, शारदा जोशी, अलका जाधव, रूपा तितरमारे, संध्या तांबट, स्मिता छाजेड, ज्योती देवरे, रेखा गिल, सुनंदा दशपुते, सरला मुसळे, अर्चना विसावे, पल्लवी दिवाण आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (Latest Marathi News)

Women members of the Laughter Club present at the 'Maithrin Meet-up' program at 'Sakaal' Satpur office.
Nashik Godavari Gaurav Award : सर्व कलांमध्ये साहित्यकला सर्वश्रेष्ठ : न्या. नरेंद्र चपळगावकर

शहरात हास्य योगाची कम्युनिटी

शहरात १०० पेक्षा जास्त हास्य क्लब आहेत. प्रत्येक क्लबमध्ये ५० पेक्षा जास्त सदस्य आहेत. या क्लबच्या माध्यमातून सर्व महिला-पुरुष एकत्र येतात. दररोज दिवसाची सुरवात सुंदर हास्य योगाने करतात. एखाद्या दिवशी क्लबमधील सदस्य आला नाहीच तर त्याच्या घरी जाऊन चौकशी करतात.

काही समस्या असेल तर, सर्वांच्या सहकार्याने ती सोडवितात. त्यामुळे कोणत्याही दिवशी एकही सदस्य क्लबमध्ये अनुपस्थितीत राहत नाही ही क्लबची खासियत आहे. क्लबच्या माध्यमातून शहरात हास्य योगाची मोठी कम्युनिटी तयार होत आहे. जी नेहमी नाशिककरांना हसत राहण्याचा प्रांजळ सल्ला देतात.

येथे वयाची अट नाही

हास्य योगा केवळ वयोवृद्धांसाठी आहे, असा गैरसमज आहे. आज शाळेतल्या मुलापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांचे आयुष्य ताणतणावाने वेढले आहे. तो तणाव हलका करण्याचे काम हास्य योगातून होते. पूर्वी मानेला पट्टा, कमरेला पट्टा लावून हास्य क्लबमध्ये सदस्य यायचे आता सर्वांनी पट्टे काढून ठेवले आहेत. रविवारी झालेल्या हास्य दरबार कार्यक्रमात ९२ वर्षाच्या तरुणीने नृत्य केले.

Women members of the Laughter Club present at the 'Maithrin Meet-up' program at 'Sakaal' Satpur office.
Nashik News : जिल्ह्यातील हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे पोलिस भरती सराव परीक्षा, प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.