नाशिक : इलेक्ट्रिक बाईक क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळविलेल्या व नाशिकचे स्टार्टअप असलेल्या रिवॅम्प मोटो प्रा. लि. यांना राष्ट्रीय स्तरावरील 'नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड २०२२'ने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी (ता.१६) दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते जयेश टोपे व सहकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख पारितोषिकांसह व्यवसाय वृद्धीची संधी या पुरस्काराच्या माध्यमातून मिळणार आहे. (Nashik Startup Revamp Moto get National Award Opportunities for business expansion with cash prizes nashik news)
राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त दिल्ली येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या देशभरातील निवडक स्टार्टअप्सला आमंत्रित करण्यात आले होते. व सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी स्टार्टअप्स्ची घोषणा करण्यात आली.
यामध्ये दळणवळणाच्या गटातून ट्रान्स्पोर्ट सर्व्हीस ॲण्ड इन्फ्रान्स्ट्रक्चर या प्रकारातून या स्टार्टअपची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक असे आहे. तसेच गुंतवणूकदार, कॉर्पोरेट क्षेत्रासमोर सादरीकरणाची संधी पुरस्कारार्थी स्टार्टअप्स्ला मिळणार आहे.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
नाशिकमध्ये कारखाना उभारण्याचे उद्दिष्ट
मल्टीयुटीलिटी अर्थात बहुउपयोगी असे 'रिवॅम्प मित्रा' हे ई-वाहन रिवॅम्प मोटो या स्टार्टअपतर्फे विकसित करण्यात आलेले आहे. या अभिनव संकल्पनेला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळालेला असून, नाशिकच्या या स्टार्टअपमध्ये दिग्गजांनी गुंतवणूकदेखील केलेली आहे.
नाशिकच्या भूमीतून विकसित झालेल्या या स्टार्टअपसाठी वाहन निर्मितीचा कारखाना नाशिकलाच उभारण्याचा मानस जयेश टोपे व सहकार्यांनी व्यक्त केला आहे. जयेश टोपे, प्रीतेश महाजन व पुष्कराज साळुंके यांनी मिळून हे स्टार्टअप विकसित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.