Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

Nashik News : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला कांद्याचा मोठा फटका बसल्यानंतर जाग्या झालेल्या राज्य सरकारने कांदा साठवणुकीसाठी ‘महाबँके’ची घोषणा केली.
Nashik Onion News
Nashik Onion Newsesakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला कांद्याचा मोठा फटका बसल्यानंतर जाग्या झालेल्या राज्य सरकारने कांदा साठवणुकीसाठी ‘महाबँके’ची घोषणा केली. मात्र, कांदा दराबाबत ठोस निर्णय न घेता साठवणुकीवर भर दिला. वास्तवात नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कांद्यापेक्षा साठवण क्षमता अधिक असल्याने ‘महाबँक’ योजना नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी निव्वळ फार्स ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Nashik Onion News)

त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’ अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र आहे. वर्षाला सरासरी ३० ते ३५ लाख टन उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी पाच लाख टन कांदा तत्काळ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणला जातो.

यानंतर शिल्लक राहिलेला २० ते २५ लाख टन कांदा सहकारी, खासगी व फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या चाळींमध्ये साठवला जातो. कृषी विभागाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यात एक लाखांवर सहकारी व खासगी कांदाचाळी उभारण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण साठवण क्षमता २५ लाख ३८ हजार २५७ टन असल्यामुळे जिल्ह्यात कांदा साठवण्याची समस्याच राहिलेली नाही.

अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ‘महाबँक’ योजनेची घोषणा नेमकी कोणासाठी केली, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. राहिला प्रश्‍न कांद्यावर विकिरण प्रक्रिया करून तो साठवण्याचा तर ही प्रक्रिया फक्त लासलगाव येथे होते. त्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांना वाहतूक खर्च परवडत नाही. त्यासाठी प्रतिकिलो तीन ते चार रुपये खर्च येतो. (latest marathi news)

Nashik Onion News
Nashik News : अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास बंदी! अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांचे आपत्ती विभागाला निर्देश

त्यामुळे प्रतिक्विंटल हजार ते बाराशे रुपये दर मिळत असताना प्रतिकिलो चार रुपये खर्च करण्यास शेतकरी तयार होत नाहीत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात कांदा विकिरणचा प्रयोग अपयशी ठरला आहे. परिणामी, कांद्याच्या दराबाबत राज्य सरकारने निर्णय घेणे अपेक्षित असताना त्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे.

उन्हाळ्यातच पाच लाख टन कांद्याची विक्री

उन्हाळ कांद्याची साठवण क्षमता असली तरी आर्थिक अडचणींमुळे शेतकरी मार्च, एप्रिल, मे व जूनमध्येच कांद्याची विक्री करतो. दर वर्षी पाच लाख टन कांद्याची विक्री या तीन ते साडेतीन महिन्यांतच होते. त्यामुळे २० ते २५ लाख टन कांदा साठवला जातो. त्याची क्षमताही विविध योजनांच्या माध्यमातून उभारलेल्या कांदाचाळींच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील कांदा लागवडीचे क्षेत्र (हेक्टर; उत्पादन टनात)

वर्षे.............खरीप कांदा.......लेट खरिप.......उन्हाळ.....कांद्याचे उत्पादन

२०१८-१९....३७४२०..........४६४३७.......८८५४५....३० लाख टन

२०१९-२०.....२७७९९..........५८३९५.......१७१३१०...४१ लाख टन

२०२०-२१.....२३०७८..........७७५९८......१६६५०३...३४ लाख टन

२०२१-२२......३०७८४.......६०८४३.......२१६६७४...५७ लाख टन

२०२२-२३.......२७६०९......५१३२१.......२२१८६४...५७ लाख टन

२०२३-२४.......१६००.........४८४८१.......१४१९८१...३३ लाख टन

वार्षिक सरासरी..२९२७८.......५८९१९.......१९०,०००...३० लाख टन

Nashik Onion News
Nashik Encroachment : वाहतुकीला अडथळा ठरणारे रॅम्प, बोर्ड हटविणार! अतिक्रमण विभागाचा निर्णय

ठळक वैशिष्ट्ये

-जिल्ह्यात शासनाच्या ३२ हजार ६१७ कांदाचाळी

-या चाळींची कांदा साठवण क्षमता सात लाख ११ हजार ९०० टन

-व्यापारी व खासगी कांदाचाळी ६६ हजार ३३६

-त्यांची साठवण क्षमता १७ लाख २६ हजार ३५७ टन

-फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या कांदाचाळीत एक लाख टन क्षमता

-उन्हाळ कांद्याची साठवण क्षमता २५ लाख ३८ हजार ६४० टन

-जिल्ह्यातील १७ पैकी १५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव

Nashik Onion News
Nashik District : ‘कलेक्टोरेट’च्या वैभवशाली 155 वर्षांचा विसर; जिल्ह्याला लाभले 105 जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.