Nashik ZP News : शिक्षकांच्या यंदा केवळ विनंती बदल्या! प्रशासकीय बदल्या न करण्याचा शासनाचा निर्णय

Nashik News : राज्य शासनाने यंदा शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करण्याचा निर्णय घेतला असल्याने केवळ विनंती बदल्या केल्या जाणार आहेत.
transfers
transfers esakal
Updated on

Nashik News : राज्य शासनाने यंदा शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करण्याचा निर्णय घेतला असल्याने केवळ विनंती बदल्या केल्या जाणार आहेत. विनंती बदल्यांसाठी तालुकास्तरावरून अर्ज मागविले जात आहेत. यातही जिल्ह्यातील बिगर आदिवासी तालुक्यातील शिक्षकांच्याच विनंती बदल्या होतील. (state government has decided not to make administrative transfers of ZP teachers this year)

ही बदली प्रक्रिया राबविल्यावर शिक्षक भरतीतील शिक्षकांना पदस्थापना दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, बदलीसंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास अद्याप कोणतेही पत्र वा सूचना प्राप्त झालेल्या नसल्याचे सांगण्यात येते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्व शिक्षकांना प्रतीक्षा असते ती बदल्यांची.

त्यासाठी शिक्षक संघटना कामाला लागलेल्या असतात. शिक्षक बदलीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याची सुरवात झाली आहे. प्रथम जिल्हांतर्गत, त्यानंतर आंतरजिल्हा बदल्या करण्यात येणार असून, शेवटी नव्याने भरती झालेल्या शिक्षकांची पदस्थापना केली जाईल. शासनातर्फे प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे केवळ विनंती बदल्या करण्यात येतील. यासाठी तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत अर्ज मागविले जात आहेत. या बदल्या ऑफलाइन करण्यात येतील. निकष मात्र ऑनलाइन बदली प्रक्रियेचे वापरण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, या सर्वांची बदली होणे शक्य नाही. (latest marathi news)

transfers
Nashik Lok Sabha Constituency : पूर्वमधून महायुतीला लीड; पश्चिम, मध्यकडे लक्ष

रिक्त असलेल्या पदांवरच या बदल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे सोयीच्या ठिकाणी आपली वर्णी लावून घेण्यासाठी शिक्षकांकडून ‘फिल्डिंग’ लावण्याचे काम सुरू झाले. विनंती बदली प्रक्रिया नाशिक जिल्ह्यात केवळ बिगर आदिवासी असलेल्या आठ तालुक्यांत राबविली जाणार आहे. आदिवासी (पेसा) तालुक्यातील भरती प्रक्रियेबाबतचा वाद न्यायालयात आहे.

त्यामुळे या भागातील बदली प्रक्रियेला स्थगिती असल्याने या तालुक्यात बदली प्रक्रिया राबविली जाणार नाही. बिगर आदिवासी तालुक्यातील शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रिया पार पडल्यावर येथे नव्या भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना मिळणार आहे.

transfers
Nashik District Hospital : सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.