Nashik News : गुजरात आणि मध्यप्रदेशासह उत्तर महाराष्ट्रातील सर्वच शहरांना जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग क्रमांक तेवीस आहे. या मार्गावर असलेल्या नांदुरमध्यमेश्वर गावाजवळच्या गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने तो अडचणीचा ठरत आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे राज्यमार्ग खंडित होऊन वाहने अडकून पडतात. त्याचा दळणवळणाला मोठा फटका बसतो. पुलाला उंची द्यावी किंवा नव्याने उंचीचा पूल बांधण्यात येऊन हा मार्ग कायमस्वरूपी कसा चालू राहील, यासाठी संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. (state highway was built but bridge on lap was short term impact of lack of far sighted thinking)