Nashik News : महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वीज निर्मिती होत असते मात्र ज्या ठिकाणी वीज निर्मिती होते त्याच ठिकाणी वीज महाग केली जात आहे. उत्पादन ज्या ठिकाणी होते तेथेच जास्त दराने का वीज विकली जाते असा सवाल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व ऊर्जामंत्री यांच्याकडे केला आहे. (Electricity tariff hike)
ग्रामीण भागातील वीज ग्राहक वीजदर वाढीमुळे पूर्णतः वैतागलेला आहे. विशेषता जे ग्राहक नियमितपणे बिले भरतात त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीने लघु दाब घरगुती ग्राहक व्यापारी व शेतकरी व उच्च दाब उद्योग या ग्राहकांवर सदरची वीजदर वाढ खूप मोठ्या प्रमाणावर लादली आहे.
यामुळे सरासरी 25 ते 40 टक्के पर्यंत वीजदर वाढ झाली आहे. प्रति युनिटमध्ये महावितरण दरवाढ करत आहे. यामध्ये महावितरण कडून इंधन अधिभार मीटर भाडे सुरक्षा अनामत यातील सर्वच वाढ करून ग्राहकांकडून वसुली चालवली आहे. यामुळे 25 ते 35 टक्के दर वाढ झालेली आहे हेही तितके महत्त्वाचे आहे. (latest marathi news)
महावितरण कंपनीने घरगुती ग्राहकांना प्रति 100 युनिट पुढे चार रुपये 71 पैसे, 101 ते 300 युनिट पर्यंत दहा रुपये 29 पैसे, 300 ते 500 युनिट साठी 14 रुपये 55 पैसे, 500 युनिट पुढे 16 रुपये 24 पैसे अशी दरवाढ केलेली आहे. या सर्व दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर 24 ते 40% दरवाढ ही लागू झालेली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक या महावितरणच्या भोंगळ कारभाराला पूर्णता वैतागलेला आहे. तेव्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीकडे लक्ष घालून सर्वसामान्य ग्राहकाची यामाधून सुटका करावी अशी मागणी विलास पांगारकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.