Nashik : नातलगांच्याच वासनेने पीडिता शिकार; सावत्र बापाची अल्पवयीन मुलीवर, सासरच्यांकडून महिलेवर अत्याचार

Latest Crime News : नाशिकरोड परिसरात सावत्र बापाने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला
molestations
molestationsesakal
Updated on

नाशिक : अंबड परिसरात सख्या दिरानेच भावजईवर भरदिवसा अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, आता नाशिकरोड परिसरात सावत्र बापाने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला तर, देवळाली कॅम्प परिसरात चुलत सासऱ्यासह दिराने घरातीलच महिलेवर तब्बल तीन वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनांमुळे नात्यातल्याच वासनांधांकडूनच महिलांचे लैगिंक शोषण होत असल्याचे समोर आला आहे. (Stepfather molestation with minor daughter )

नाशिकरोड परिसरात रविवारी (ता२२) सायंकाळी बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. पीडिते १३ वर्षीय मुलीच्या आईने नाशिकरोड पोलीसात नराधम पतीविरोधात फिर्याद दिली असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. रविवारी (ता.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास पीडितेची आई व दोन लहान मुलींना घेऊन किराणा आणण्यासाठी गेली होती.

त्यावेळी पीडितेचा नराधम सावत्र बाप घरात टीव्ही पहात होता तर पीडिता बाहेर भांडी धूत होती. संशयिताने पत्नी गेल्याचे हेरून पीडितेला घरात बोलाविले. दाराला आतून कडी लावून तिला वरच्या मजल्यावर नेले आणि तिच्या जबरदस्तीने अत्याचार केला. पीडिता रडायला लागली असता, संशयिताने चाकूचा धाक दाखवून सदरची बाब कोणाला सांगायची नाही. अन्यथा आई अन्‌ बहिणींना मारून टाकण्याची धमकी दिली.

molestations
Nashik Traffic Issue : रस्त्यावरच्या कोंडीत; विद्यार्थ्यांचा जीव मुठीत

पीडितेची आई घरी आल्यानंतर सदरची बाब उघडकीस आली असता, त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक शिंदे हे तपास करीत आहेत.

चुलत सासरा, दीराकडून अत्याचार

पीडितेच्या फिर्यादीनुसार, चुलत सासूने पीडितेचे अंघोळ करतानाचे फोटो काढले होते. ते फोटो पीडितेला दाखवून संशयित चुलत दिराने ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केले. त्याचप्रमाणे, चुलत सासऱ्यानेदेखील पीडितेला धमकावत मुक्तिधाम परिसरात लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

सलग तीन वर्षे संशयितांनी तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पीडितेने देवळाली कॅम्प पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार चुलत सासू, चुलत सासरे व चुलत दिरा या तिघांविरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला उपनिरीक्षक कोळी या तपास करीत आहेत.

molestations
Nashik Cyber Fraud : बनावट पोर्टलवरून आयपीओ खरेदीतून लाखोंचा गंडा; सायबर भामट्यांनी केली 94 लाखांची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.