Nashik Grapes Storage : 20 हजार टन द्राक्षांची शीतगृहात साठवणूक; जून महिन्यापर्यंत खवय्यांना चव चाखता येणार

Grapes Storage : अवकाळीमुळे झालेले नुकसान, पेड कटिंगची रूजलेल्या पद्धतीमुळे द्राक्ष हंगामाला यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच पूर्णविराम लागेल.
cold storage house (file photo)
cold storage house (file photo)esakal
Updated on

Nashik Grapes Storage : अवकाळीमुळे झालेले नुकसान, पेड कटिंगची रूजलेल्या पद्धतीमुळे द्राक्ष हंगामाला यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच पूर्णविराम लागेल. महिनाभर अगोदर द्राक्ष हंगाम संपणार असला, तरी शीतगृहांमध्ये यंदा २० हजार टन द्राक्षांची साठवणूक झाली आहे. त्यामुळे बागांमध्ये नसले, तरी शीतगृहातील द्राक्षांची गोड चव खवय्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाखता येणार आहे. (Nashik Storage of 20 thousand tons of grapes in cold storage marathi news)

स्पर्धेक फळे अपेक्षित प्रमाणात बाजारात उपलब्ध नसल्याने द्राक्षांचे दर सर्वकालीन उंचीवर पोचू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदाचा द्राक्ष हंंगाम गेल्या आठ ते दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना सुखावणारा ठरला आहे. यंदा आगाप बाजारात आलेल्या द्राक्षाला कमी दर, पण हंगामाच्या अखेरीस जोरदार तेजी आली.

दरवर्षापेक्षा उलट चित्र हंगामात दिसत आहे. अवकाळीने सुमारे २० टक्के द्राक्ष पिकांची नासाडी झाली. त्यामुळे उत्पादनाचा टक्का घसरला. त्यातच पेड कटिंगच्या पद्धतीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने महिनाभर अगोदर हंगाम संपणार आहे. उत्तर प्रदेशसह परराज्यात रमजान व नवरात्री उत्सवामुळे द्राक्षांना मागणी वाढली आहे.

त्यातच संत्रा, टरबूज, मोसंबी ही द्राक्षाला टक्कर देणारी फळे यंदा अवकालीमुळे उद्धवस्त झाली. त्यामुळे उन्हाळ्यात फळाचा एकमेव पर्याय द्राक्ष आहेत. पुरवठ्यापेक्षा दुप्पट मागणी झाल्याने दहा वर्षांत प्रथमच स्थानिक बाजारपेठेच्या द्राक्षांनी ४५ रुपये किलो, असा भाव खाल्ला आहे.(latest marathi news)

cold storage house (file photo)
Nashik Grapes News : दराअभावी द्राक्ष हंगामाचा गोडवा हरपला; 18 ते 25 रुपये किलो

चार रुपये भाडे

नाशिक जिल्ह्यात ६८ शीतगृहे आहेत. त्याची एकूण क्षमता २५ हजार टन साठवणुकीची आहे. यंदा व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनीही भविष्यातील वेध घेत द्राक्ष साठवणुकीला पसंती दिली आहे. ० ते एक डिग्रीमध्ये द्राक्षाचे क्रेट्‌स व बॉक्स ठेवले आहेत. सुमारे वीस हजार टन द्राक्षांनी शीतगृहे हाऊस फुल्ल झाली आहेत.

टप्प्याटप्प्याने मागणी येईल, तशी शीतगृहातील द्राक्ष पाठविली जात आहे. दरमहा प्रतिकिलो चार रुपये दराने शीतगृहात भाडे आकारण्यात येत आहे. दोन महिन्यांपर्यंत द्राक्षांचा दर्जा टिकून राहतो. त्यामुळे बागांमध्ये द्राक्ष नसले, तरी शीतगृहात द्राक्ष भरली आहेत. त्यामुळे जून महिन्यापर्यंत द्राक्षांचा आस्वाद घेता येणार आहे.

''दरातील तेजी पाहून व्यापारी व शेतकऱ्यांनी द्राक्ष साठविण्याकडे यंदा अधिक दिसत आहे. (कै.) अशोकराव बनकर पतसंस्थेत तीन हजार टन द्राक्ष साठविली आहेत.''-रामभाऊ माळोदे, अध्यक्ष, (कै.) अशोकराव बनकर पतसंस्था, पिंपळगाव बसवंत

cold storage house (file photo)
Nashik Grapes : द्राक्ष हंगामात यंदा ‘पेड कटिंग’चा फंडा; रोकडबरोबरच द्राक्षमालाची हेळसांड कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.