Nashik News : जेलरोड परिसरातील त्रिवेणी पार्क आणि चंपानगरी परिसरात भटक्या कुत्र्यांनी दोन पाच वर्षा आतील चिमुकल्यांना चावा घेतला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे या परिसरात नागरिक दहशतीखाली असून महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा स्थानिकांकडून केली जात आहे. (Stray dogs bite children in Jail Road area)
नाशिक रोड येथील सतेज किरण जाधव (चंपानगरी) आणि दीक्षा प्रदीप सूर्यवंशी (त्रिवेणी पार्क) या दोघांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला. दोन्ही बालकांवर एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेलरोड परिसरात मागील काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. परिसरात अनेक भागात भटके कुत्रे झुंडीने येत गोंधळ घालतात.
त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये या भटक्या कुत्र्यांची चांगली दहशत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हातात घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. (latest marathi news)
"नाशिकमध्ये एकच डॉग व्हॅन असल्यामुळे प्रश्न सुटत नाही. चिमुरड्यांच्या जिवाशी महापालिका किती दिवस खेळणार ? याकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नाशिक मनपाला या संदर्भात निवेदन दिले आहे." - किरण जाधव (पालक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.