Nashik News : पथदीप उभे राहिले, दिवे मात्र लागेनात! सटाणातील दोधेश्वरनाका ते ॲकॅडमीपर्यतच्या रस्त्याचे काम वर्षभरापासून ठप्प

Nashik News : एक ते दीड वर्ष उलटूनही पालिकेस या खांबांवर दिवे बसविण्याचा विसर पडला की काय अशी चर्चा होत आहे.
A street lamp standing as an ornament between Dodheshwar Naka and Baglan Academy
A street lamp standing as an ornament between Dodheshwar Naka and Baglan Academyesakal
Updated on

सटाणा : शहर सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली पालिकेने नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातून जाणाऱ्या नामपूर- सटाणा रस्त्यावर दोधेश्वर नाका ते बागलाण अॅकॅडमीपर्यंत दोन किलोमीटरपर्यंत विद्युत खांब (पथदीप) उभे केले आहेत. मात्र एक ते दीड वर्ष उलटूनही पालिकेस या खांबांवर दिवे बसविण्याचा विसर पडला की काय अशी चर्चा होत आहे.

पालिका संबंधित ठेकेदाराकडे तर ठेकेदार पालिकेकडे बोट दाखवीत असल्याने या कामाचे मोठे हसू झाले आहे. शहरवासीय एक शोभेची वस्तू म्हणून या पथदिपांकडे बघत आहेत. (Road work from Dodheshwarnaka to Academy in Satana stopped for year)

पथदीपाच्या या कामासाठी पालिकेने २४ लाख ९९ हजार ९०८ रुपये किमतीच्या निविदा काढल्या. सागर इलेक्ट्रिकल्स कंपनीची निविदा मंजूरही केली. १४ नोव्हेंबर २०२२ ला वर्क ऑर्डर निघाली, मात्र शंभर पैकी ९१ विद्युत खांब पालिकेच्या हद्दीत तर ९ खांब पालिका हद्दीबाहेर जात असल्याने ठेकेदाराने पुढचे काम केले नाही. मग या उरलेल्या नऊ खांबांच्या एकूण किमतीचे राजकारण रंगू लागले.

१०० खांबाची निविदा मंजूर मग ९ खांबांचे पाणी कुठे मुरले याचे संशोधन सुरू झाले. माजी आमदार संजय चव्हाण यांनी निधीचा अपहार होत असल्याची तोफ डागून प्रशासनास कात्रीत पकडले. शंभर खांबांचे अंतर भरून काढण्यासाठी पथदीप जवळजवळ उभारण्यात आले आहेत? एकाच कामाचे दोन तुकडे का करण्यात आले? दिव्यांचा अतिरिक्त खर्च नगरपालिका प्रशासनावर टाकण्याचे कारण काय?

या राज्यमार्गावर गरज नसताना शंभर पथदिपांची प्रशासकीय मान्यता तत्काळ रद्द करा, पथदिपांची अंतर्गत वायरिंग करताना कोणतीही सुरक्षितता घेण्यात आलेली नाही, महामार्गाच्या साईडपट्ट्यांच्या आत पथदीप उभारले आहेत अशा एकूण १३ वादातीत मुद्द्यांवर चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत चौकशी झाली.

चौकशी समितीने २८ एप्रिल २०२३ ला स्थळ पाहणी करून आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराच्या बिलाची रक्कम २४ लाख ९९ हजार ९०८ रुपये अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले.

मात्र शासनाकडे निधी अपुरा असल्याचे निमित्त सांगून बिलाची उर्वरित रक्कम अडकून पडली आहे. वर्षभरात पालिका प्रशासनाने दिवे खरेदीसाठी प्रयत्न केलेला नाही, म्हणून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. विद्युत ठेकेदाराचे निम्मे बिल अदा न करण्यामागे एखाद्या राजकीय शक्तीचा हस्तक्षेप तर नाही ना? अशा चर्चाही शहरात रंगल्या आहेत. (latest marathi news)

A street lamp standing as an ornament between Dodheshwar Naka and Baglan Academy
Sakal Exclusive : "पद मिळालं तर निष्ठेने काम करणार...", किरण माने थेट बोलले

सागर इलेक्ट्रिकल्स या विद्युत ठेकेदाराने पथदीप उभारण्याचे काम उपकंत्राटदार संदीप पगार यांच्याकडून करून घेतले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांचा संदीप हा जवळचा नातेवाईक असून संजय चव्हाण व यतीन पगार यांच्यात सध्या विळ्या भोपळ्याचे नाते असल्यामुळे राजकीय वादही आहेत. यामुळेच संजय चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या असाव्यात व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराच्या बिलाची रक्कम रोखली तर नाही ना? याबाबत उलट सुलट चर्चा आहे.

"सागर इलेक्ट्रिकल्स या ठेकेदाराने पथदीप उभारण्याचे काम मंजूर असताना शासनाचे सर्व नॉर्म्स धाब्यावर ठेवून संदीप पगार पोट ठेकेदाराकडून हे काम करून घेतले जात आहे. विजेच्या एका खांबाची किंमत बाजारभावापेक्षा तिप्पट लावून मंजुरी घेतली गेली. गरज नसतानाही ९ अतिरिक्त खांब, केबल, दिवे यांचा पैसा नेमका गेला कुठे? राजकीय शक्तींचा हा केविलवाणा प्रयत्न चव्हाट्यावर येईल. यात गैरप्रकार असल्यामुळेच बिलाची रक्कम अडकून पडली आहे."

- संजय चव्हाण, माजी आमदार, बागलाण.

A street lamp standing as an ornament between Dodheshwar Naka and Baglan Academy
Manipur violence: "1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता, तेल ओतणाऱ्यांनी शांत बसा...."; PM नरेंद्र मोदी मणिपूरवर राज्यसभेत बोलले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.