Nashik Police: योग्य नियोजनाने करता येते ताणतणावावर मात; पोलिसांसाठीच्या कार्यशाळेत मानसोपचार तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

SAKAL IMPACT News : ‘दै.सकाळ’मधून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताणतणाव यासंदर्भातील कार्यशाळा घेण्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते.
Police Workshop
Police Workshop esakal
Updated on

नाशिक : वेळेचे नियोजन योग्यरितीने नियोजन केल्याने मानसिक व शारीरिक येणारा ताण कमी होतो. वाईट सवयींपासून दूर राहिले पाहिजे. कामाच्या नियोजनाप्रमाणेच आर्थिक व्यवस्थापन केल्यास अपेक्षा मर्यादित राहून ताणतणावापासून मुक्त राहता येणे शक्य असल्याबाबत मोलाचे मार्गदर्शन मानसोपचार तज्ज्ञांनी केले. (Nashik Psychiatrists guided workshop for police marathi news)

‘मानसिक आरोग्य व ताणतणाव’ याविषयी कार्यशाळेत उपस्थित पोलीस बांधव.
‘मानसिक आरोग्य व ताणतणाव’ याविषयी कार्यशाळेत उपस्थित पोलीस बांधव.esakal

शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय ‘मानसिक आरोग्य व ताणतणाव’ याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, कार्यशाळेला जिल्हा शासकीय रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर, डॉ. अमोल पुरी, सायकॉलॉजिस्ट पवनकुमार पवार, अरविंद पाईकराव, श्रीमती शितल अहिराव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पोलीस निरीक्षक इरफान शेख हे उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मार्गदर्शन करताना, कामाचा ताण येऊ नये यासाठी कामाचे व्यवस्थापन केले तर ताण येत नाही. वेळेचेही गणित आखता आले पाहिजे. तसे केल्याने काम करण्याचाही आनंद मिळतो. तरीही कामाचा अतिरिक्त ताण वाटत असेल तर वरिष्ठांशी बोला.

आपल्याशीही थेट संपर्क साधा, असेही आवाहन केले. यावेळी आयुक्तालयातील पोलिस अधिकारी, कर्मचारी कार्यशाळेला उपस्थित होते. शेवटी कर्मऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन तज्ज्ञांनी केले. तसेच, मानसिक तणाव वाढल्यास मानसोपचार तज्ज्ञ वा जिल्हा रुग्णालयात येऊन समुपदेशन घेण्याचेही आवाहन केले.

Police Workshop
Polish Grand Prix Shooting : अखिल शेरॉन, अनिश भानवाला यांना ग्रांप्रि नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण

हे करावंच

- कामाच्या वेळेचे योग्य नियोजन

- वाईट सवयींपासून दूर रहावे

- अनावश्यक अपेक्षा ठेवल्यानेही वाढतो ताण

- आर्थिक व्यवस्थापन करणे आवश्यक

- मानसिक संतुलन राखण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने

- कुटूंबिय, सहकारी, मित्रांशी सतत संवाद साधा

- मानसिक ताण वाटल्यास त्याविषयी इतरांची बोला

‘सकाळ’चा परिणाम

गेल्या महिन्यात अंबडचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्त्या केली होती. त्यावेळी ‘दै.सकाळ’मधून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताणतणाव यासंदर्भातील कार्यशाळा घेण्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आयुक्तालयातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी या कार्यशाळेला प्रारंभ झाला आहे.

Police Workshop
Pune News : पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाची नवीन इमारत उभारणार; बांधकामासाठी १९३ कोटींच्या निधीस मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.