नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वत:च्याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने पोलिस दलच नव्हे तर शहर हादरले आहे. अशा घटनांमागे नैराश्य आणि मानसिक तणाव (Mental Stress) असतो. याची सहज लक्षात येणारी लक्षणे ओळखली तर आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापासून त्या व्यक्तीला परावृत्त करता येऊ शकते, असे मानसोपचार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. (Nashik SAKAL Psychiatrists Stress Management marathi news)
प्रदीर्घ मानसिक तणावातून व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत सापडले. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वर्तणुकीमध्ये हळूहळू बदल होऊ लागतात. कधी खूप बोलका असणारा कमी बोलायला लागतो. विनाकारण चिडचिड करू लागतो. एकांगी वागायला लागतो. कामापुरता दुसऱ्याशी संवाद साधतो.
अशी एक ना अनेक लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे कुटुंबीयांसह नजीकच्या मित्रांच्या लक्षात आली तर त्या व्यक्तीला वेळीच बोलता करता आले पाहिजे. तो बोलता झाला तर त्याच्या मानसिक तणावाचे निराकरण होऊ शकते. नैराश्याच्या गर्तेतून ती व्यक्ती बाहेर येऊ शकते.
अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांकडूनही उपचार घेतले तर वेळीच ती व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सावरते. आणि त्यास आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त करता येऊ शकते, असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
- वागण्या-बोलण्यातील बदल
- पूर्वीसारखे फ्रेश नसणे वा फ्रेश न वाटणे
- विनाकारण चिडचिड करणे
- कामावर लक्ष केंद्रित (कॉन्स्ट्रेशन) न होणे
- अवेळी झोप, जेवणामुळे शारीरिक-मानसिक तणाव येणे
- विनाकारण उदासीनता येणे
- मित्रांपासून अलिप्त होणे
- चर्चेत सहभाग न घेणे
- नैराश्य असलेल्यास बोलते करा
- नैराश्यामागील समस्या जाणून घ्या
- अबोल झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा
- नियमित मानसिक चाचणी करावी
- सकारात्मकता आणा
- मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या
यांनी चाचणी करावीच
अत्यावश्यक सेवा म्हणून पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्राकडे पाहिले जाते. पोलिस अधिकारी-कर्मचारी वा डॉक्टर्स यांच्यावर वेळी-अवेळी कामाचा ताण येतो. अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांची नियमित मानसिक चाचणी करणे बंधनकारक असायला पाहिजे. मानसोपचार तज्ज्ञांकडून वेळीच चाचणी झाली तर योग्यवेळी उपचार सुरू करता येऊ शकतात.
"तणावामुळेच नैराश्य येते असे नव्हे. त्याशिवायही व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत सापडू शकतो. त्यासाठी स्वत:मध्ये सकरात्मकता असायला हवी. तसेच, नजीकचे मित्र, कुटुंबीयांतील व्यक्तीशी जे काही असेल ते बोलते राहिले पाहिजे. जीवन सुंदर असून, सकारात्मकतेने त्याकडे पाहिले तर आनंदाने ते जगता येते."- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ
"आत्महत्येचा विचार मनात येतो, तो क्षणिक असतो. ती वेळ टाळता येऊ शकते. त्यासाठी भावनांची जागरूकता ओळखता आली पाहिजे. त्यावर मात केली तर ती वेळ टळते. नैराश्य वेळीच ओळखता आले पाहिजे. मनात साठवून न ठेवता ते इतरांशी शेअर केल्याने मनावरचा तणाव हलका होतो. सकारात्मकता येते. मानसोपचार तज्ज्ञांकडे वेळीच उपचार घेतले तर उपचाराने नैराश्यातून बाहेर पडता येते."- डॉ. नीलेश जेजुरकर, मानसोपचार तज्ज्ञ.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.