Nashik News : पेपरफुटीविरोधात कडक कायदा करावा! नाशिक शहर काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष पटोले, थोरात यांच्याकडे मागणी

Nashik News : आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये पेपरफुटीविरोधात विधेयक आणून कडक कायदा करण्यात यावा, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेसने केली आहे.
Question Paper Leak
Question Paper Leakesakal
Updated on

Nashik News : आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये पेपरफुटीविरोधात विधेयक आणून कडक कायदा करण्यात यावा, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेसने केली आहे. याबाबत विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. गत काही दिवसांपासून देशात व राज्यांमध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, तसेच अन्य परीक्षांमध्ये गोंधळ झाला आहे. (strict law against Exam paper Leak)

प्रवेश परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे फुटीचे प्रमाण खूप वाढले आहे. या पेपरफुटी प्रकरणात शिक्षण व्यवस्थेचे अनेक अधिकारी, संस्था, तसेच शिक्षणाचा काळाबाजार मांडणाऱ्या व्यक्तींचा संबंध उघडकीस येत आहे. या पेपरफुटीमुळे देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यादाच केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निष्काळजीमुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढत आहे. स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून देशातील विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकीय क्षेत्र व इतर क्षेत्रांमध्ये प्रवेश घेत असतात. (latest marathi news)

Question Paper Leak
Nashik Teacher Constituency Election : बोगस मतदार सिद्ध झाल्यास मुख्याध्यापकावरच कारवाई

केंद्र सरकार व राज्य शासनाने या कथेत पेपरफुटी प्रकरणातल्या संबंधित लोकांवर कारवाई करावी. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पेपरफुटीविरोधात विधेयक काढून या कथेत भ्रष्टाचाराच्या विरोधात व पेपरफुटीच्या विरोधात कडक कायदा करावा, असे या निवेदनामध्ये नमूद केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेच्या वतीने पेपरफुटीविरोधात कायदा करावा, यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी माहिती दिली.

Question Paper Leak
Nashik MD Drug Case : ‘एमडी’ ड्रग्जसचा तपास ‘कासव’गतीने; दोघांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.