Nashik Citylinc Bus Strike : सिटीलिंक महाव्यवस्थापक-ठेकेदार बैठक निष्फळ; शहर बससेवा ठप्पच

Citylinc Bus Strike : डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे वेतन तसेच पीएफ आणि ईएसआय रक्कम खात्यावर जमा न केल्याने वाहकांनी संप पुकारला आहे.
Striking conductors sit outside the Citylink bus service office on Trimbak Road on Tuesday.
Striking conductors sit outside the Citylink bus service office on Trimbak Road on Tuesday.esakal
Updated on

Nashik Citylinc Bus Strike : गेल्या वर्षीच्या डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे वेतन तसेच पीएफ आणि ईएसआय रक्कम खात्यावर जमा न केल्याने वाहकांनी संप पुकारला आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मनपाच्या सिटीलिंक वाहकांनी पुकारलेल्या संपावर मंगळवारी (ता.१९) साडे तीन ते चार वाजेदरम्यान सिटीलिंक महाव्यवस्थापक व संबंधित ठेकेदार बैठक झाली. (Nashik Strike Citylinc General Manager Contractor meeting fruitless marathi news)

मात्र, यात काही तोडगा न निघाल्याने सिटीलिंक बससेवा सहाव्या दिवशीही विस्कळित झालेली दिसून आली. त्यामुळे चाकरमाने, विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. तर नाशिक रोड डेपोच्या बससेवा सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील महिन्यात संपावेळी आश्वासन दिले की, डिसेंबर महिन्याचे थकीत वेतन ५ मार्च रोजी दिले जाईल.

आणि सात ते १० मार्च पर्यंत ई एस आय खात्यावर व जमा करण्या संदर्भात माहिती देऊ असे सांगितले होते. ११ ते १४ मार्च या कालावधीत जानेवारी व फेब्रुवारी वेतन देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदार यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने पुन्हा एकदा गुरुवार (ता.१४) पासून वाहकांनी संप सुरू केला आहे. मंगळवार (ता.१९) सायंकाळपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही.

संबंधित ठेकेदार यांनी पुन्हा एकदा आश्वासन देत संप मागे घेण्यास सांगितले. मात्र, थकीत वेतन, पीएफ व ईएसआय रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा सिटी लिंक बस सेवा वाहकांनी घेतला आहे. मंगळवारीही (ता.19) सकाळपासून तपोवन डेपोतून एकही बस शहरात निघाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (latest marathi news)

Striking conductors sit outside the Citylink bus service office on Trimbak Road on Tuesday.
Nashik Citylinc Employees Strike : सिटी लिंक बस सेवा ठप्प! वाहकांनी पुकारला संप

कर्मचाऱ्यांचे डॉ. भारती पवारांना साकडे

तपोवनातील डेपोच्या वाहकांनी डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे कर्मचारी तपोवनातील डेपोतून सुटणाऱ्या सिटीलिंकच्या बसेसवर वाहक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या मागण्यांसाठी आतापर्यंत आठ वेळा त्यांनी कामबंद आंदोलन केले आहे.

आंदोलनावेळी आश्वासन दिल्याने कामबंद आंदोलन मागे घेऊनही मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याची तक्रार या वाहकांनी केली आहे. तपोवनातील सिटीलिंक बसडेपोत १५० बसेस असून, त्या तीन शिफ्टमध्ये शहराच्या विविध भागात फेऱ्या करतात. त्यासाठी सुमारे साडेपाचशे वाहक कार्यरत आहेत.

वेतन थकल्याने घरभाडे भरणेही महाग

सिटीलिंक बस सेवेत असलेले बहुतांश वाहक हे आदिवासी पाड्यावरून आलेले आहेत. यात पुरुष व महिलाही कार्यरत आहेत. त्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने घरभाडे भरता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वाहकांना घरमालकांनी घर रिकामे करायला लावले आहे. त्यात महिला वाहकांचीही संख्या अधिक आहे. यातील काही महिला वाहकांना तर मंदिराच्या परिसरात रात्र काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्या थेट आदिवासी पाड्यावर बस डेपोपर्यंत रोज ये-जा करीत आहेत.

Striking conductors sit outside the Citylink bus service office on Trimbak Road on Tuesday.
Nashik Citylinc Bus Strike : NMCला रोजचा साडेआठ लाखांचा भुर्दंड! बससेवा बंदमुळे प्रवाशांची गैरसोय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.