नाशिक : मिळणारे पगाराचे गडेलठ्ठ पॅकेज, मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध व्यापक रोजगाराच्या संधी यांमुळे संगणक व संलग्न शाखांतून अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. कॉम्प्युटर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲन्ड डेटा सायन्स यांसह संगणकाशी संलग्न शाखांमध्ये प्रवेशासाठी तिसऱ्या प्रवेशफेरीनंतरही रस्सीखेच कायम आहे. नाशिक विभागात १६ हजार ६१ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित केले असून, अद्यापही सात हजार १०७ जागा रिक्त आहेत. (struggle for admission in Computer affiliated branches)