Nashik News : पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशापासून वंचित? राज्य शासनाकडून अद्यापही कापड उपलब्धतेची प्रतीक्षा

Nashik News : यंदा शासन स्तरावरून जिल्हा व तालुकास्तरावर कापड उपलब्ध करून ते बचत गटाच्या माध्यमातून शिवून घेतले जाणार आहे.
Students to attend school without new uniforms
Students to attend school without new uniformsesakal
Updated on

Nashik News : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य- एक गणवेश धोरण’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यासाठी यंदा शासन स्तरावरून जिल्हा व तालुकास्तरावर कापड उपलब्ध करून ते बचत गटाच्या माध्यमातून शिवून घेतले जाणार आहे. मात्र, १ जून उजाडत आलेला असताना तालुकापातळीवर कापड मिळालेले नाही. (Students deprived of uniform on first day of school)

त्यामुळे पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

तसेच, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनाही देण्याबाबतचा शासन निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय शाळा सुरू होण्यापूर्वी अवघ्या काही दिवसांत घेतल्याने गेल्या वर्षी गणवेशाबाबत गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने एक राज्य एक गणवेश धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण परिषदेने निविदा प्रक्रिया राबविली. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून कापड पुरवून महिला बचत गटामार्फत गणवेश शिलाई होणार आहे. (latest marathi news)

Students to attend school without new uniforms
Nashik NMC : होर्डिंग कोसळल्यास ‘एसटी’ जबाबदार! महामंडळाच्या जागेवरून पोलिसांना पत्र

शिलाई करून तयार झालेले गणवेश शाळा मुख्याध्यापकांना दिले जाणार आहेत. त्यासाठी महामंडळाकडून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे कापड दिले जाणार आहेत. मात्र, अद्याप तालुकास्तरावर कापड उपलब्ध झालेले नाही. बचत गटांना शिलाईबाबत कळविलेले असल्याने ते सज्ज आहेत.

नाशिक जिल्हा सोडून इतर काही जिल्ह्यांमधील तालुक्यांना कापड प्राप्त झाले आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात कापड कधी मिळणार, हे अस्पष्ट आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे सध्या तरी अशक्य आहे. विद्यार्थ्यांना शाळा उघडल्यावरही पुढील काही दिवस गणवेशाची प्रतीक्षा करावी लागेल.

तीन लाख विद्यार्थी

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण तीन हजार २०० शाळा असून, यात तीन लाख २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यंदा थेट गणवेश मिळणार असल्याने विद्यार्थी आनंदात होते. परंतु, पहिल्या दिवशी गणवेश मिळणे अशक्य दिसत आहे.

असा असणार गणवेश

एक राज्य एक गणवेश अंतर्गत मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट किंवा हाफ पँट, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाची सलवार, आकाशी रंगाची कमीज असे गणवेशाचे स्वरूप असणार आहे.

Students to attend school without new uniforms
Nashik NMC : पावसाळ्यापूर्वी जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखापरिक्षण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.