School Bag free Saturday : दप्तरमुक्त शनिवार उपक्रमाने विद्यार्थी आनंददायी! ग्रामीण भागात मिळतोय प्रतिसाद

Nashik News : सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
rural students with no bag
rural students with no bagesakal
Updated on

कळवण : शैक्षणिक सत्र २४-२५ सुरू झाले असून नवीन शैक्षणिक सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांमधे असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, वर्तन जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या उदात्त हेतूने सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराला शनिवारी सुट्टी मिळणार आहे. (Nashik Students happy with bag free Saturday activity)

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक, कल्पनाशक्ती, नैतिक मूल्ये असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत असल्याने त्या पार्श्वभूमीवर शालेय जीवनात ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांची शाळेत होणारी गळती, अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. (latest marathi news)

rural students with no bag
Career : काय शिकायचं? कधी शिकायचं?? आणि त्याचं करायचं काय??? तुम्हाला सापडली का ही उत्तरे?

"प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांच्या दप्तराला सुट्टी देण्यासंदर्भातील शालेय शिक्षण विभागाचे पत्र शाळांना प्राप्त झाले आहे. राज्य पातळीवर विविध समित्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आनंददायी शनिवार या उपक्रमाचा समवेश करण्यात आला आहे. निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल आणि अभ्यासातील रुची वाढण्यास मदत होईल."- हेमंत बच्छाव, गटशिक्षणाधिकारी, कळवण.

"दप्तरमुक्त शनिवार उपक्रमात खेळ खेळू शकतो, वेगवेगळ्या योगासनांची प्रात्यक्षिके शिकवली जातात. त्यामुळे सुदृढ आरोग्य घडविण्यास मदत होते. शिक्षक नवीन संकल्पना सांगतात, कृती करून घेतात. चांगल्या सवयी, शालेय, परसबाग काम त्याचबरोबर आठवडी बाजार, स्पेलिंग बी, वेगवेगळ्या क्षेत्रांना भेटींचे आयोजन केले जाते. सर्व विद्यार्थी शनिवारची आनंदाने वाट पाहत असतो."- ज्ञानदा थोरात, जि. प. शाळा, मुली क्र. २

"दप्तरमुक्त शनिवार मला खूप आवडतो, कारण प्रत्येक शनिवारी दप्तराशिवाय इतर वेगळ्या काहीतरी गोष्टी शिकायला मिळणार असतात. आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी ज्ञानसमृद्धी हा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांचा उपक्रम घेतला जातो. Let's speak उपक्रमात विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याची संधी मिळते. योगासने, नवनवीन खेळ, प्रात्यक्षिके घेतले जातात. दर शनिवारी नवीन काहीतरी शिकण्यास मिळणार आहे."

- अनमोल मोरे, जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा, कळवण

"दप्तरमुक्त शनिवार ही संकल्पना प्राथमिक शिक्षणावर सकारात्मक परिणाम करणारी आहे. गेले वर्षभर आम्ही आमच्या शाळेत शनिवार -फनिवार या नावाने दप्तरमुक्त शनिवार उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती शंभर टक्के राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी यातून उपलब्ध झाली. सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला."

- परमेश रामचंद्र खैरनार, प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा, कळवण.

rural students with no bag
Sakal Exclusive : "पद मिळालं तर निष्ठेने काम करणार...", किरण माने थेट बोलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.