विद्यार्थ्यांना 'मातृभाषेतून' दर्जेदार शिक्षण गरजेचे

डॉ. प्रधान : नर्मदा जीवनशाळा व पैगंबर तांबोळी अरुण ठाकूर स्मृती पुरस्काराने सन्मानित
Students need quality education in mother tongue
Students need quality education in mother tonguesakal
Updated on

नाशिक : विद्यार्थ्यांच्या सुदृढ व दर्जेदार जडणघडणीसाठी इतर कोणत्याही भाषेपेक्षा मातृभाषेत घेतलेले शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी एकमेकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख जीवनोपयोगी शिक्षण देणे अतिशय गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान यांनी केले. आविष्कार शिक्षण संस्था व आनंद निकेतन यांच्यातर्फे शुक्रवारी सायंकाळी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी अरुण ठाकूर स्मृती पुरस्काराने सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या दऱ्या- खोऱ्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या नर्मदा जीवनशाळेस गतवर्षीचा (२०२१), तर सोलापूर जिल्ह्यातील मुलांना समाजपयोगी विज्ञानप्रयोग व संशोधन करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या पैगंबर तांबोळी यांना चालू वर्षाच्या (२०२२) अरुण ठाकूर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले.

कोरोनामुळे गतवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे दोन्ही वर्षाच्या पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले. मुख्याध्यापिका नीलिमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर आनंद निकेतनच्या संचालिका निवेदिता काळगी, एमकेसीएलचे विवेक सावंत, पुरस्कारप्राप्त शिक्षक पैगंबर तांबोळी, प्रभाकर पावरा आदी उपस्थित होते. नर्मदा जीवनशाळेचा पुरस्कार तेथील दोन शिक्षकांनी, तर यंदाचा अरुण ठाकूर पुरस्कार पैगंबर तांबोळी प्रातनिधिक स्वरूपात स्वीकारला.

एकवीस हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुलांमध्ये विज्ञानाविषयी संशोधनवृत्ती वाढविणारे सोलापूर जिल्ह्यातील पैगंबर तांबोळी यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण उपयोगाचे नसून तर शालाबाह्य पर्यावरणपूरक व दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांचा सूचना व कल्पनांचा स्वीकार करण्याचा आग्रह त्यांनी धरला. नर्मदा जीवनशाळेचे शिक्षक श्री. वापरा यांनी मेधा पाटकर, विस्थापित आदिवासी समाज, संस्थेचे कार्य याविषयी माहिती दिली. आनंद निकेतन शाळेची शिक्षण पद्धती उपक्रमांवर आधारित ‘आनंद निकेतन : अ जर्नी टू जॉयफूल ॲन्ड मिनिंगफूल एज्युकेशन’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.