Nashik News : ‘IIT’त निवडलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव; पालकमंत्री दादा भुसे, खासदार, आमदारांकडून सुपर 50 उपक्रमाचे कौतुक

Nashik : नावीन्यपूर्ण उपक्रमातून जिल्हा परिषदेने २०२२ मध्ये सुरू केलेल्या ‘सुपर- ५०’ या योजनेतील सात विद्यार्थ्यांची आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटीत निवड झाली आहे.
Guardian Minister Dada Bhuse, MPs, MLAs and officials welcoming students who have succeeded in 50 activities.
Guardian Minister Dada Bhuse, MPs, MLAs and officials welcoming students who have succeeded in 50 activities.esakal
Updated on

Nashik News : नावीन्यपूर्ण उपक्रमातून जिल्हा परिषदेने २०२२ मध्ये सुरू केलेल्या ‘सुपर- ५०’ या योजनेतील सात विद्यार्थ्यांची आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटीत निवड झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांसह त्यांचा पालकांचा सत्कार करण्यात आला. खासदार व आमदारांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. विशेष म्हणजे यापुढेही हा उपक्रम कसा सुरू राहील, यादृष्टीने आर्थिक तरतूद करण्याचे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. (Students selected in IIT honored by Guardian Minister Dada Bhuse and MP MLA praise Super 50 initiative)

जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांना अकरावी व बारावी विज्ञान शाखेत मोफत शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने २०२२ मध्ये ‘सुपर ः ५०’ ही योजना सुरू केली. २०२२ ते २०२४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी व जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षणही देण्यात आले. सलग दोन वर्षांच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० पैकी २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन या विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा दिली. (latest marathi news)

Guardian Minister Dada Bhuse, MPs, MLAs and officials welcoming students who have succeeded in 50 activities.
Nashik News : इंजिनिअर युवकाचा दुग्ध प्रकिया प्रकल्प लोकप्रिय! कृषि विभागाचे मार्गदर्शन

यापैकी सात विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. ७) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा सत्कार केला. या बॅचमधील २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होत जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा दिली. यातील अश्विनी बोरसे (ऑल इंडिया रँक ९६८), डिंपल बागूल (१०१०), हर्षदा वाटणे (२२६३), आकांक्षा शेजवळ (२९९३), मंगेश इमपाळ (३०४२), सागर जाधव (३०४७), वृषाली वाघमारे (६१८९) यांनी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. खासदार डॉ. शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, आमदार सीमा हिरे, माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, समिती सदस्य यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Guardian Minister Dada Bhuse, MPs, MLAs and officials welcoming students who have succeeded in 50 activities.
Nashik News : मातब्‍बरांकडून उमेदवारी अर्ज दाखल; पुढाऱ्यांची ‘एंट्री’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.