ICSE Board Result 2024 : 'आयसीएसई' बोर्ड निकालात चमकले नाशिकचे विद्यार्थी

Nashik News : राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण मंडळ असलेल्‍या 'आयसीएसई'चा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी (ता.६) जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करताना यश पटकावले.
ICSE Board Result 2024
ICSE Board Result 2024 esakal
Updated on

Nashik News : राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण मंडळ असलेल्‍या 'आयसीएसई'चा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी (ता.६) जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करताना यश पटकावले. अशोका ग्रुप ऑफ स्‍कुल्‍समधील विभा सोनवणे, व तनिष्क कौरानी यांनी ९९.२० टक्‍के गुण मिळवताना नाशिकमधून संयुक्‍तरित्‍या पहिला क्रमांक पटकावला आहे. (Nashik ICSE board results)

निकाल जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थी व त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी जल्‍लोष केला. लेखी परीक्षा पार पडल्‍यापासून विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्‍सुकता लागून होती. त्‍यातच 'आयसीएसई'चा इयत्ता दहावी, व इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला.

अशोका ग्रुप ऑफ स्‍कूल्‍सच्‍या विद्यार्थ्यांची यशस्‍वी कामगिरी

अशोका ग्रुप ऑफ स्‍कूल्समधील दोन विद्यार्थ्यांनी संयुक्‍तरित्‍या पहिला क्रमांक पटकावला आहे. अशोका मार्ग शाखेतील विभा सोनवणे आणि अर्जुननगर शाखेतील तनिष्क कौरानी यांनी ९९.२० टक्‍के गुण मिळविताना शाळेसह शहरात अव्वल क्रमांक पटकावला. अशोका मार्ग शाखेतून ओजस उपासनी आणि मनस्वी फड (९९ टक्‍के) यांनी संयुक्तरित्या द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

अर्जुन नगर शाखेतून अनन्‍या भानुवंशे (९९ टक्‍के) द्वितीय तर स्‍मृती जिंत्रे (९८.६० टक्‍के) हिने तृतीय क्रमांक पटकावला. दोन्‍ही शाखांचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. अशोका मार्ग शाखेतील १८९ विद्यार्थ्यांपैकी ९९ टक्‍के विद्यार्थी विशेष श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले. अर्जुन नगर शाखेतील ११० विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्‍के विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीतून यश मिळविले आहे. (Latest Marathi News)

ICSE Board Result 2024
Nashik Onion News: नामपूरला कांद्याची जंबो आवक! रविवारीच मार्केट झाले फुल्ल; चांगल्या कांद्याला प्रथमच दोन हजारापुढे भाव

यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्‍थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त आस्‍था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्‍ला, उच्च माध्यमिकच्‍या प्राचार्या रेणुका जोशी, मुख्याध्यापक प्रमोद त्रिपाठी, उच्च माध्यमिक विभागाच्‍या मुख्याध्यापिका संध्या बोऱ्हाडे, प्राथमिक विभागाच्‍या उपप्राचार्या डॉ.प्रिया डिसूझा आदींनी केले आहे.

होरायझन ॲकॅडमीचा शंभर टक्‍के निकाल

मविप्र संस्‍थेच्‍या होरायझन अॅकॅडेमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील आयसीएससी बोर्डाचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. शाळेतन ईशांत चौधरी (९७.६० टक्‍के) याने प्रथम क्रमांक पटकावला. आर्यन थेटे (९७.०० टक्‍के) द्वितीय, परा ठाकरे (९६.८० टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेची ही अकरावी तुकडी असून विद्यालयातील १३१ विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थ्यांना ९० टक्‍यांपेक्षा अधिक तर ६७ विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणी, २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. समाजशास्त्रात स्वरा दराडेने, गणितात ईशांत चौधरीने शंभर गुण मिळविले. संगणक विषयात ईशांत चौधरी, आदिती निकम, अंश बोरसे, तर कला विषयात त्रिवेणी दळवीने शंभर गुण मिळविले. शारीरिक शिक्षण विषयात आर्यन थेटे, राज मोरेने शंभर गुण मिळविले.

ICSE Board Result 2024
Nashik NMC News : मनपाची ऑनलाइन सेवा विस्कळित! 8 तासानंतरही सर्व्हर डाऊन

मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी बी. डी. पाटील, मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा यांनी अभिनंदन केले आहे.

फ्रवशीची शंभर टक्‍के निकालाची परंपरा कायम

आयसीएसई अभ्यासक्रम सुरु केल्‍यापासून फ्रवशी ॲकॅडमीने गेल्‍या पंधरा वर्षांपासून शंभर टक्‍के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा सोळाव्‍या वर्षी शाळेचा शंभर टक्‍के निकाल लागला. शाळेतून क्रिशिका अग्रवाल (९८.८० टक्‍के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर रुद्र जाधव (९८.४० टक्‍के) द्वितीय, रुद्र शिंदे (९८ टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला आहे.

फ्रवशी ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष रतन लथ, उपाध्यक्षा शर्वरी लथ, व्‍यवस्‍थापकीय संचालिका मेघना बक्षी, व्‍यवस्‍थापकीय मंडळाने सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना भावी वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

ICSE Board Result 2024
Nashik News : मालेगावात 40 टक्के गटारी स्वच्छ; उर्वरित काम 15 दिवसात पूर्ण करणार

पोदार स्कूलमध्ये वरुनचा पहिला क्रमांक

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून, शाळेचा शंभर टक्‍के निकाल लागला आहे. शाळेतून वरुण पवार (९८.११ टक्‍के) याने प्रथम क्रमांक पटकावला. रुही पाटील आणि तेजल भोसले यांनी ९७.११ टक्के गुणांसह संयुक्‍तरित्‍या दुसरा क्रमांक मिळविला. युवराज गागरेने ९७.०३ टक्के गुणांसह तृतीय स्‍थान राखले. १२४ विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थ्यांनी नव्वद टक्‍यांपेक्षा जास्‍त गुण मिळविले आहेत.

प्राचार्य डॉ. मनोहर महाजन, उपप्राचार्य शोफी दवे यांच्‍यासह शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. पोदार एज्युकेशन नेटवर्कचे अध्यक्ष डॉ. पवन पोदार, गौरव पोदार आणि हर्ष पोदार आणि सरव्‍यवस्‍थापक समीर वागळे यांनी सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शुभेच्‍छा दिल्‍या.

रायन स्‍कूलमध्ये प्रज्ञाने मारली बाजी

डीजीपी नगर येथील रायन इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. इयत्ता दहावीच्‍या परीक्षेत प्रज्ञा साहु हिने ९७.४ टक्‍के गुण मिळविताना प्रथम क्रमांक पटकावला. हृषिकेश राव (९७.२ टक्‍के) द्वितीय, तर आयुष कुमार (९७ टक्‍के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

ICSE Board Result 2024
Nashik News : पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रासह अन्य राज्यांवर अन्याय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.