नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यातर्फे सोमवारी (ता.८) रात्री उशिरा जेईई मेन्स पेपर क्रमांक एकचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत नाशिकच्या अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
रेयान आझीम शेख याने ९९. ९४ पर्सेंटाईल गुण मिळवून भरीव कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांनी जेईई ॲडवास्ड परीक्षेसाठी पात्रतादेखील मिळविली आहे. (Nashik students success in JEE Mains final result nashik Latest Marathi News)
एनटीएतर्फे जून आणि जुलै महिन्यात अशा दोन सत्रांमध्ये राष्ट्रीय पातळीवर जेईई मेन्स परीक्षा घेतली होती. संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे.
दोन्ही परीक्षांचा मिळून अंतिम निकाल जारी केला असून, त्याआधारे जेईई ॲडवास्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पात्रता प्राप्त झालेली आहे. नाशिकच्या स्पेक्ट्रमच्या १९ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलहून अधिक गुण मिळविले. ३९ विद्यार्थ्यांनी ९८ पर्सेंटाईल मिळविले आहेत.यामध्ये रेयान आझीम शेख (९९.९४), प्रथमेश बाविस्कर (९९.९३), अनन्या बघेल (९९.८९), सर्वेश बाहेती (९९.८४), तन्मय कुलकर्णी (९९.८०), आर्यन दुशिंग (९९.७१),
आदित्य मुंदडा (९९.६५), सोहम कदम (९९.५८), सिद्धेश वाजे (९९.५५), आदित्य पाटील (९९.५०), श्रीकांत दिघोळे (९९.४८), सॅम्युअल गंगोडक (९९.४०), परिमल अमृतकर (९९.३४), तेजस वाघ (९९.३४), शशांक कदम (९९.३३), श्रिया भदाणे (९९.१६), मृण्मयी कुलकर्णी ( ९९.११), मयूर बोरसे (९९.०९), दर्शन बिऱ्हाडे (९९.०५) यांचा समावेश आहे. रेझोनन्सच्या विद्यार्थ्यांनीदेखील यशस्वी कामगिरी केली आहे. येथील सायमा पाथरवट (९९.९१), अंकित सिंह (९१.५३), सार्थक बोरसे (९९.१७) यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविताना यशस्वी कामगिरी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.