Nashik Police Promotion : महाराष्ट्र पोलीस दलातील सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या पोलिस अंमलदारांना पोलीस महासंचालक कार्यालयाने सुखद धक्का दिला आहे. सेवानिवृत्तीच्या सहा-सात दिवसआधीच अंमलदारांना उपनिरीक्षकपदी बढती देण्याचे आदेश महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागाने दिले असून, नाशिक आयुक्तालयातील पाच अंमलदारांचा यात समावेश आहे. (Sub Inspector Promotion on verge of retirement City Commissionerate)
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातून येत्या ३१ मे रोजी अंमलदार सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, यातील काहींनी पोलीस खात्यांतर्गत परीक्षा दिली असता, त्यात ते उत्तीर्ण झाले आहेत. स्थानापन्न पंचवीस टक्के रिक्त पदात पदोन्नतीचे आदेश राज्य पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जारी केले आहेत.
यानुसार नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे पाच, मुंबई व पिंपरी चिंचवडचे प्रत्येकी दोन, नांदेड, गडचिरोली, पुणे ग्रामीण, ठाणे शहर, सोलापूर ग्रामीण, सातारा व धुळे येथील एका अंमलदाराला पदोन्नती देण्यात आलेली आहे. (latest marathi news)
निवडणूक आयोगाच्या पत्राचा संदर्भ देत विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आला. अंमलदारांना पसंतीनुसार महसूल विभाग वाटप करुन त्याच ठिकाणी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना पोलिस अंमलदारांसाठी सदरचा निर्णय सुखद धक्का देणारा ठरला आहे.
शहरातील हे झाले पीएसआय
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील श्रीराम माधवराव सपकाळ, सोमनाथ लहू सातपुते, विजय तुकाराम शिंदे, सुरेश नामदेव शेळके, सिताराम हरी साबळे हे सेवानिवृत्तीच्या आधी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) झाले आहेत. राज्यातील सर्व १६ अंमलदारांना २५ मे रोजीच पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली असून, ३१ मे रोजी हे सर्वजण महाराष्ट्र पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.