कळवण : एकीकडे सरकारी नोकरी मिळत नसल्याची ओरड तरुणांमध्ये नेहमीच ऐकायला मिळत असताना कळवण येथील प्रा. महेश कृष्णा पगार यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाचवेळी सरकारी नोकरीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले. कळवण येथील पंचायत समितीचे माजी सभापती श्री. हिरामण पगार यांचे पुतणे आणि प्रगतीशील शेतकरीश्री कृष्णा निंबा पगार यांचे चिरंजीव महेश यांनी सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी करीत जिद्द व मेहनतीने दिवस-रात्र अभ्यास करून सर्वप्रथम वनरक्षक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम. (Nashik Success Story farmer son became an extension officer)
तलाठी (नाशिक ), विस्तार अधिकारी (जि. प. पालघर) पदावर निवड झाली. ते विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर जिल्हा परिषद येथे रुजू झाले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण शासकीय जि. प. मराठी शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आर. के एम विद्यालयात झाले.
बारावीनंतर चांगले गुण असल्याने त्यांच्यासमोर भरपूर पर्याय होते. मात्र, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असल्याकारणाने त्यांनी बी. टेक. ( कृषी अभियांत्रिकी ) करण्याचा निर्णय घेतला व कोल्हापूर जिल्ह्यातील डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी 80% सह शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच चांगल्या पगाराची नोकरी मिळत असताना देखील त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला.
त्यानंतर त्यांनी नाशिक नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र मध्ये अभ्यास केला. दरम्यानच्या काळात त्यांनी एम. ए. मराठी, एम. ए. अर्थशास्त्र तसेच दोन्ही विषयांमध्ये सेट नेट देखील उत्तीर्ण केले. मानूर येथील कला वाणिज्य व विज्ञान विद्यालयामध्ये मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतानाच त्यांनी विविध परीक्षांचा अभ्यास केला. (latest marathi news)
कोणतीही शिकवणी न लावता त्यांनी स्वतः अभ्यास केला. त्यांना प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. आर्थिक परिस्थिती बेताची असून देखील व अनेक वेळा यशाने हूलकावणी दिल्यानंतर देखील संयम, चिकाटी या गुणांच्या जोरावरती मिळवलेल्या उत्तुंग यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
"मी माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील, काका आणि मित्र परिवाराला देतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना इतरांशी तुलना न करता स्वतःच्या क्षमतेचा विचार करून ध्येयाची निवड करा व नेहमी प्रयत्नशील रहा."- महेश पगार
त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी महेश पगार अकॅडमी या यूट्यूब चैनल ची निर्मिती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.