चांदोरी : एकेकाळी स्त्रियांचं आयुष्य फक्त चुल आणि मुलं इतक्याच चौकटीत बांधलेले होते. मात्र, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवून महिलांना या चौकटीतून बाहेर काढले. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या महाज्योतीच्या विभागीय समन्वयक सुवर्णा हिराबाई पोपटराव पगार यांची शिक्षणाची वाटचाल अनेकांना प्रेरणादायी अशीच आहे. (Suvarna pagar passed SET Exam for tough journey)