Nashik News : शहरामध्ये डेंगी व चिकूनगुनियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या दोन्ही आजारांमध्ये अचानक शरीरातील पेशींचे प्रमाण कमी होते. या पेशी वाढविण्यासाठी हजारो रुग्ण सध्या उपचार घेत आहे. या साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर किवी फळांची मागणी वाढली आहे. रुग्णांकडून अधिक मागणी होत असल्यामुळे किवी या फळाच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात सध्या वाढ झाली आहे. (increase in demand for kiwi fruit in wake of epidemic disease)
शहरात बदलत्या हवामानामुळे घराघरांमध्ये सर्दी, ताप, खोकला याचे रुग्ण बघावयास मिळत आहे. यामध्ये विशेष करून वायरल इन्फेक्शन व डेंग्यू व चिकूनगुनिया रुग्ण सर्वाधिक आहे. यामध्ये शरीरातील पेशी अचानक मोठ्या संख्येने कमी होतात. आजारातून बरे होण्यासाठी रुग्ण व त्याचे नातेवाईक वेगवेगळे प्रयत्न करतात व उपचारही घेतात.
शरीरातील पेशी वाढविण्यासाठी नातेवाईकांकडून किवी फळ अधिक प्रमाणात रुग्णासाठी सुचविले व दिले जात आहे. किवी पोषक समृद्ध फळ म्हणून ओळखले जाते. अँटिऑक्सिडंट फळ आहे. पपईप्रमाणे नैसर्गिकरित्या पोटॅशियम व्हिटॅमिन क व सी इत्यादी पोषणतत्त्वे यामध्ये असतात. (latest marathi news)
व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींना संक्रमणाशी लढण्यासाठी वाढवितात तर किवीचे इतर पोषक घटक शरीरातील उर्वरित कार्य व्यवस्थितपणे चालवतात. या फळाच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलशी संबंधित ट्रायग्लिसराईडची पातळी ही नियंत्रणात राहते. हृदय व रक्त वाहिन्या संबंधित आजारांमध्येही हे फळ उपयुक्त आहे. ग्रीन किवीची किंमत दोन महिन्यापूर्वी १०० रुपये होती, ती आता १४० झाली आहे. तर गोल्डनची किंमत दीडशे होती, ती आता दोनशे रुपये झाली आहे.
"सध्या शहरांमध्ये डेंगी, चिकूनगुनिया रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अचानक किवी फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातल्या सर्व भागातील ग्राहक आमच्याकडे किवी घेण्यासाठी येत आहे." - संदीप अमृतकर, फोर सीझन फ्रूट्स अँड ड्राय फ्रूट्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.