Nashik Sugar Factory : यंदा नाशिक साखर कारखान्याच्या आजी-माजी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. २०१३ पासून थकलेले पगार फंड आणि सोसायटीची रक्कम कामगारांना सहीसलामत परत मिळेल. त्यामुळे कामगार संघटनेच्या एकीच्या बळामुळेच हे सर्व शक्य झाल्याने कामगार वर्ग आनंदी आहे.
नाशिक सहकारी साखर कारखाना २०१३ पासून बंद होता. त्यामुळे कामगारांची ग्रॅच्युइटी, फंड, पगाराची रक्कम मिळालेली नव्हती. नासाका कर्मचारी संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांच्या पुढाकाराने साखर विक्रीतून ही रक्कम कामगारांना लाभ म्हणून देण्याचे प्रयत्न सुरू झाले. (nashik sugar factory workers will get 6 crore news)
मात्र, याला अनेक कायदेशीर अडचणी येत होत्या. जिल्हा न्यायालयापासून हा लढा २०१३ पासून सुरू झाला. थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी झालेल्या करारानुसार कामगारांना साखर विक्रीतून पगारासाठी देय रक्कमेकरिता पैसे घेण्याची भूमिका घेतली.
यानुसार नासाका कामगार संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, कार्याध्यक्ष शिवराम गायधनी, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव बोराडे, सोसायटीचे तत्कालीन चेअरमन यांना सोबत घेऊन पाच वर्षे कायदेशीर लढा दिल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कौल, सदाशिव दुलिया यांच्या खंडपीठाने १३ ऑक्टोबर २०२३ नुसार (याचिका क्र. २३७११/२०१४ ) सदरची सहा कोटी रक्कम कामगारांना देण्यास अंतिम मंजुरी दिली आहे.
सोसायटीचे चेअरमन जयकिसन गायखे, सुभाष हुळहुळे, सचिव पांडुरंग मोंढे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गायधनी, रामचंद्र टिळे, विठ्ठल घुले, भिवसन गुळवे, मधुकर मुठाळ, शंकर रोकडे, शरद पगार, भाऊसाहेब आडके, दत्तात्रय कर्पे व कामगार वर्गाने आभार मानले आहेत.
"गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला यश मिळाल्याचे समाधान आहे. अनेकांना निवृत्तीनंतर एक रुपया मिळालेला नव्हता. किमान आता तरी साखर कारखान्यासाठी काम केल्याचे समाधान वाटले." - विष्णुपंत गायखे, कामगार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.