Summer Health Care : उन्हाकडे दुर्लक्ष करू नका, बचावसाठी काळजी घ्या : वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

Nashik News : सुती आणि पांढरे कपडे वापरावेत असे आवाहन महापालिका आयुक्त रवींद्र जाधव व आरोग्याधिकारी जयश्री आहेर यांनी केले आहे.
Summer Health Care
Summer Health Careesakal
Updated on

विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा

टेहरे : सध्या तापमानात दररोज वाढ घट होत असली तरी ते ४२ ते ४४ अंशाच्या दरम्यान असल्याने मालेगाव शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कडक उन्हाकडे दुर्लक्ष करू नका त्यापासून बचावासाठी उपाययोजना करा, काळजी घ्या असे आवाहन करत उष्माघात टाळण्यासाठी शक्यतो सकाळी दहानंतर, दुपारच्या उन्हात बाहेर पडू नये असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या लग्नसराईची धूम असल्याने उन्हाची पर्वा न करता अनेक जण बाहेर पडत आहे. अशा वेळी आवश्यकक ती खबरदारी घ्यावी. सुती आणि पांढरे कपडे वापरावेत असे आवाहन महापालिका आयुक्त रवींद्र जाधव व आरोग्याधिकारी जयश्री आहेर यांनी केले आहे. (nashik Summer Health Take Care for Prevention Appeal of Medical Experts news)

कडक उन्हाने जनजीवन पुरते प्रभावित झाले आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत आहेत. गेल्या आठवड्यापासून उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. मध्येच ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. डोक्यावर उपरणे, टोपी, गॉगल, तर महिलांनी सन कोट, स्कार्प वापरून स्वतःची काळजी घ्यावी. वृध्द व लहान मुलांनी उन्हात अजिबात चालू नये. सोबत पाण्याची बाटली ठेवावी.

दर अर्ध्या तासाने सावलीत बसून पाणी प्यावे. कडाक्याच्या उन्हात जास्त थंड पाणी लगेच पिऊ नये. नागरिकांनी सकाळी अकराच्या आत कामे उरकवावीत. दुपारी घराबाहेर पडू नये. टोपी, उपरणे, गॉगल वापरुन उन्हापासून बचाव करावा. उष्माघात टाळण्यसाठी नागरिकांनी आवश्‍यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

उष्माघाताची लक्षणे :-

- चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे;

- मळमळ किंवा उलट्या, डोकेदुखी

• तीव्र तहान लागणे, गडद पिवली लघवी होणे

• वेगवान श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके.

(latest marathi news)

Summer Health Care
Summer Car Care : उन्हाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी कारची करा तपासणी; 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

उष्माघात टाळण्यासाठी...

• तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्यावे.

• प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा.

• ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) वापरा.

- लिंबू पाणी, ताक /लस्सी, रस प्यावा.

• हंगामी फळे, टरबूज, कस्तुरी खरबूज, द्राक्षे, अननस, काकडी खा.

• पातळ सैल, सूती कपडे शक्यतो पांढऱ्या रंगाचे घालावे.

• बाहेर पडताना टोपी, टॉवेल, शक्यतो शूज घालावेत.

Summer Health Care
Summer Hair Care : उन्हाळ्यात केस खराब होतात? मग, अशी घ्या तुमच्या केसांची काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.