Nashik Summer Heat Disease: उन्हाने हिरावला ज्येष्ठांचा विरंगुळा! वाढत्या उष्णतेने आरोग्याच्या तक्रारींत वाढ

Nashik News : उन्हाळ्यातही गारवा देणारे थंड वातावरण अशी नाशिक शहराची ओळख. सर्वांना अनुकूल आणि आवडणारं शहर म्हणून अनेकांचा कल नाशिककडे असतो
Summer Heat Disease
Summer Heat Diseaseesakal
Updated on

Nashik Summer Heat Disease : उन्हाळ्यातही गारवा देणारे थंड वातावरण अशी नाशिक शहराची ओळख. सर्वांना अनुकूल आणि आवडणारं शहर म्हणून अनेकांचा कल नाशिककडे असतो. यंदा मे महिन्यापूर्वीच मात्र शहरातील तापमान चाळिशी पार गेले आहे.

या वाढत्या उष्णतेला ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने उष्णतेच्या प्रतिकूल परिणामांना बळी पडत आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे घराबाहेर पडता येत नसल्याने ज्येष्ठांचा विरंगुळा हिरावला जात आहे. याचा थेट परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे समोर आले आहे. (Nashik Summer Heart Disease Increase in health complaints due to rising temperature)

आयुष्यभर कामानिमित्त धावपळ केलेले ज्येष्ठ नागरिक आपल्या रिटायरमेंट लाईफमध्ये विरंगुळा शोधण्यासाठी घराबाहेर पडतात. सकाळचा मॉर्निंग वॉक, हास्य क्लब तसेच ज्येष्ठ नागरिक संघांच्या माध्यमातून विविध उपक्रमात सहभागी होतात. यासह घरगुती कामांसाठी ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडतात.

मात्र वाढत्या उन्हामुळे त्यांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यापासून बचावासाठी ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. उन्हापासून बचावासाठी आपले खानपान तसेच उन्हाळ्यात परिधान करावयाचे कपडे कोणते असावे हे देखील महत्त्वाचे आहे.

या त्रासाने ज्येष्ठ बेजार

उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या होतात. ज्येष्ठ नागरिकांची झोप मुळात कमी वेळेची असते. त्यात उष्णतेमुळे झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे अस्वस्थपणा येतो. तसेच कफामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास देखील होत आहे. हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या असलेल्यांना उष्ण हवामानामुळे देखील त्रास होतो.  (latest marathi news)

Summer Heat Disease
Nashik Summer Heat : जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या वेळेत बदल; महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय

अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात तहान लागत नसली तरीही पाण्याचे सेवन वाढवा.

चहा, कॉफी आणि कॅफिनयुक्त पेये पिणे टाळा.

लिंबू सरबत, ताक, दही असे शरीराला थंडावा देणाऱ्या द्रव्यांचे सेवन करा.

खरबूज, लिंबूवर्गीय फळे, सॅलाड यासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा

शक्यतो पांढरे किंवा फिकट रंगाचे हलके आणि सैल कपडे घाला.

घराबाहेर पडताना तहान शमविण्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवा.

वैद्यकीय समस्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

"ज्येष्ठ नागरिकांची वयोमानामुळे त्वचा नाजूक आणि प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे उन्हाचा फटका हा तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांना लवकर बसतो. त्यामुळे याची काळजी घेतली पाहिजे. मुबलक पाणी, सात्त्विक अन्नाचे सेवन, वेळेवर औषधे आणि उन्हात जाणे टाळावे."- डॉ. शरद पाटील, अध्यक्ष, प्रौढ मित्र मंडळ कॉलेज रोड

"आधी मॉर्निंग वॉक, हास्यक्लबच्या निमित्ताने सकाळी सातला घराबाहेर पडत आणि साडेनऊ पर्यंत घरी पोचत. यंदा मात्र वाढत्या उन्हामुळे सात साडेसातलाच घरी निघून जावे लागते. सतत घरात राहिल्याने अस्वस्थपणा, चिडचिड होत आहे. घरात करमणुकीची साधले असली तरी ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी बाहेर पडायला आवडते. या वाढत्या उष्णतेने विरंगुळा हिरावला आहे."

- विजय भावे, अध्यक्ष, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघ.

"वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. कफ, सांधेदुखी असे देखील त्रास होत आहेत. तापमानाने असह्य झाले आहे."- जयश्री भावे

"मागील आठ दिवसापासून उष्म्याने हैराण आहे. आता पावसाळा कमी व अवकाळी जास्त.त्यासाठी काळजी घेण्यासोबत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली तर सर्वच प्रश्न सुटायला मदत होईल."- प्रा. सुमती पवार

Summer Heat Disease
Nashik Unseasonal Rain Damage: जिल्ह्यातील 729 हेक्टरला अवकाळीचा फटका! नैसर्गिक संकटाचा 107 गावांमधील 3518 शेतकऱ्यांना झळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.