Nashik Summer Heat Stroke : नाशिककरांनो उष्माघातापासून सावधान! महापालिकेचा इशारा

Nashik News : गेल्या काही दिवसात शहरात तापमानात सातत्याने वाढ होत असून, मार्चमध्येच चाळीस अंशापर्यंत तापमान पोचले.
Summer Heat Stroke
Summer Heat Strokeesakal
Updated on

नाशिक : गेल्या काही दिवसात शहरात तापमानात सातत्याने वाढ होत असून, मार्चमध्येच चाळीस अंशापर्यंत तापमान पोचले. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलशुष्कता (डिहायड्रेशन) होऊन मृत्यूदेखील ओढवण्याची शक्यता असल्याने वेळीच उपचार करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. (Nashik Summer Heat Beware of heat stroke news)

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्चमध्ये ३९ अंश सेल्सिअस वर तापमान पोचले आहे. मागील दहा दिवसात तापमानाची पातळी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. २८ मार्चला ३९.२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोचले होते. एप्रिल व मे महिन्यात तापमान अधिक वाढेल, असा अंदाज आहे.

वाढत्या तापमानामुळे दुपारी बारानंतर रस्त्यावरील गर्दी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे शहरात उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असल्याने महापालिका ॲलर्ट मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहने पार्क केल्यास वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्णघाताची कारणे

- तीव्र उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीची व कष्टाची कामे.

- कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे.

- काच कारखान्यात काम करणे.

- जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.

- घट्ट कपड्यांचा वापर.

लक्षणे

- मळमळ, उलटी, हातपायांत गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे. क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे. मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्धावस्था.

अतिजोखमीच्या व्यक्ती

बालके, लहान मुले, खेळाडू, गरोदर माता, स्तनदा माता, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदयरोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार आदी.  (latest marathi news)

Summer Heat Stroke
Heat Stroke : उष्माघाताने तरुणाचा मृत्यू; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ

प्रतिबंधक उपाय

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल, पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाचे सुती कपड्यांचा वापर करावा.

उन्हात बाहेर जाणे टाळावे, प्रवासात जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नये, गरज पडल्यास जलसंजीवनीचा वापर करावा. लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळपाणी प्यावे. उन्हात गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्रीचा वापर करावा. घरात कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे वापरावे.

असे करावे उपचार

*रुग्णास सावलीत आणावे, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे.

*रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कूलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत.

*रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये.

* रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्या. शरीराचे तापमान ३६ .८ सेल्सिअस तापमान होईपर्यंत उपचार सुरु ठेवावे.

१०८ रुग्णवाहिका

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ रुग्णवाहिकेसाठी कॉल करण्याचे आवाहन वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे.

Summer Heat Stroke
Heat Stroke : उष्माघात रोखण्यासाठी अशी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.