Nashik Summer Heat : जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या वेळेत बदल; महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय

Nashik Summer Heat : जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस पार गेले असून, उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये, यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
 nagpur weather update heat wave summer temperature 41 3 degree
nagpur weather update heat wave summer temperature 41 3 degreeSakal
Updated on

Nashik Summer Heat : जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस पार गेले असून, उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये, यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे. अंगणवाड्यांचे कामकाज सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत राहील; तर बालकांना पोषण आहार देण्याची वेळ सकाळी आठ ते दहा अशी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली. (Nashik Summer Heat Change in Anganwadi timings in district )

राज्यात उष्णतेची लाट तीव्र असून, जिल्ह्यात आगामी काळात उष्णतेची लाट तीव्र होऊन उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या उष्णतेच्या लाटेचा अंगणवाड्यांमधील बालकांना त्रास होऊ नये, यासाठी अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये बदल केला आहे. आदिवासी क्षेत्रातील केंद्राच्या वेळेबाबत ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांची वेळ सकाळी साडेसात ते साडेअकरा अशी राहील.

सकाळी आठ ते दहा या कालावधीत प्रत्यक्षात बालके अंगणवाडीत उपस्थित राहतील. यात बालकांना पूर्व शालेय शिक्षण व पूरक पोषण आहार देण्यात यावा. दहा ते साडेअकरा या कालावधीत अंगणवाडी सेविका गृहभेट देणे, अंगणवाडीतील नोंदी घेणे, कार्यालयीन दस्तावेज अद्ययावत ठेवणे आदी कामे करावीत. नागरी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांची वेळ सकाळी आठ ते दुपारी बारा अशी राहील. सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत बालके अंगणवाडीत उपस्थित असतील. (latest marathi news)

 nagpur weather update heat wave summer temperature 41 3 degree
Nashik Summer Heat : उन्हाच्या तडाख्याने जिवाची काहिली; चिमुरड्यांनी लुटला टँकरच्या रेन डान्सचा आनंद

यात त्यांना पूर्व शालेय शिक्षण व पूरक पोषण आहार दिला जावा. अकरा ते दुपारी बारा या कालावधीत अंगणवाडी सेविका गृहभेट देणे, अंगणवाडीतील नोंदी घेणे, कार्यालयीन दस्तावेज अद्ययावत ठेवणे ही कामे करावीत. अधिक उष्ण तापमानामुळे जी बालके प्रत्यक्षात अंगणवाडी केंद्रात येऊ शकणार नाहीत, त्या बालकांचा आहार त्यांच्या पालकांना घरी घेऊन जाण्याची मुभा राहणार असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी पाटील यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना काढलेल्या पत्रात म्हटले आहे.

उष्णता लाटेत ही करा कार्यवाही

बालकांना सकाळी आठ ते दुपारी बारापावेतो अंगणवाडीत उपस्थित ठेवावे, अंगणवाडीत बालकांसाठी ओआरएस ठेवण्यात यावे, बालकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावे, अमृत आहार अंतर्गत देण्यात येणारा चौरस आहारही गरोदर व स्तनदा मातांना दुपारी बारापूर्वी देण्यात यावा, उष्माघातापासून बचाव करणाऱ्या साधनांचा अंगणवाडी केंद्रात वापर करावा.

 nagpur weather update heat wave summer temperature 41 3 degree
Nashik Summer Heat : महानगरेही होतायेत उष्णतेची बेटे...मालेगावात 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.