Nashik Summer Heat : ऊन ना तडाखामा पिकं चालनात बळीळ...! अभोणा परिसरात मिरची, टोमॅटो अन कलिंगडाला फटका

Nashik News : वातावरणातील दिवसरात्रीच्या बारा ते अठरा अंश सेल्सिअस बदलामुळे रात्री थंडी व दिवसा प्रखर उष्णता याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे.
Leapcurl disease outbreak on tomato crop in the area due to increasing heat.
Leapcurl disease outbreak on tomato crop in the area due to increasing heat. esakal
Updated on

अभोणा : गेल्या दोन आठवड्यापासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे येथील परिसरातील मिरची, टोमॅटो, कलिंगड व कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. कधी नव्हे तो परिसरातील आंब्याला भरपूर मोहर आला होता. परंतु, तीव्र उष्णतेमुळे मोहर गळू लागला आहे. वातावरणातील दिवसरात्रीच्या बारा ते अठरा अंश सेल्सिअस बदलामुळे रात्री थंडी व दिवसा प्रखर उष्णता याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. (Nashik summer heat affected in Abhona area marathi news)

जानेवारी महिन्यात लागवड झालेला कांदा तसेच मिरची, टोमॅटो व कलिंगडावर विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळी खालावते आहे. परंतु, इतर तालुक्यांच्या तुलनेने गिरणाकाठ परिसरात पाण्याची पातळी अजूनही बरी आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीसच तापमानाची तीव्रता वाढू लागल्याने ‘मे’ हिटचा तडाखा आताच जाणवू लागला आहे. येत्या काळात उष्णतेची लाट वाढणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. योग्य प्रमाणात पाणी असूनही, वाढत्या उष्णतेमुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त फवारण्या घ्याव्या लागत आहे. (latest marathi news)

Leapcurl disease outbreak on tomato crop in the area due to increasing heat.
Jalgaon Summer Heat : उन्हाची तीव्रता वाढताच जुने कुलर आले बाहेर

रोगांचा प्रादुर्भाव

मिरची : भुरी, मावा, करपा, रूट क्वाईल, फुलगळ

टोमॅटो : लाल कोळी, भुरी, करपा, लीप कर्ल, तुरा अळी

कलिंगड : विलटिंग, फुलगळ, लीप कर्ल

कांदा : करपा

"शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे. भरदिवसा उन्हात पिकांना पाणी न देता, सायंकाळी चार वाजेनंतर दिवसाआड पाणी द्यावे. ताक मिश्रित व गूळ मिश्रित पाणी उष्णता रोखू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फ्लूरोपायम, सिलिकॉन, मॅजेस्टॉल, ओबेरॉन, अँबॅसिल, लुना, निसोडियम, क्वांटा, फिलिप्स, इमिडॉल, सोलोमर, बायो-३०३, कराटे, अलिका या औषधांच्या फवारण्या घ्याव्यात."- विनोद पाटील, कृषी सल्लागार, दह्याणे (पाळे)

Leapcurl disease outbreak on tomato crop in the area due to increasing heat.
Nashik Water Crisis : नांदगावी जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा! वाढत्या उन्हामुळे टंचाईग्रस्त गावांचा आकडा वाढतोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.