Nashik Summer Heat : अत्याधिक उष्म्याने नागरिक हैरान; पुढील आठवडाभर उष्णता तीव्र होण्याचा अंदाज

Nashik News : मंगळवारी (ता. २१) शहरात किमान २६, कमाल ४१. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Summer Heat
Summer Heat esakal
Updated on

Nashik News : आठवडाभरापासून सूर्य आग ओकत असल्याने शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. मंगळवारी (ता. २१) शहरात किमान २६, कमाल ४१. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. परंतु अत्याधिक उष्म्यामुळे शहरातील नागरिकांना चांगलाच चटका लागला. (Nashik Summer Heat Citizens shocked by excessive heat)

पुढील काही दिवस तापमानात किरकोळ वाढ होईल मात्र तीव्र उष्णता होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. त्यामुळे नाशिककरांना पुढचा आठवडाभर लाही लाही करणाऱ्या उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.

सूर्याच्या प्रखर किरणांमुळे अत्याधिक तीव्र उष्णतेने शहरात कमालीचा उकाडा जाणवत आहे. पायी चालणारे नागरिक, दुचाकीस्वार, प्रवाशांना उन्हाचा चटका बसला. उष्म्यापासून बचावासाठी अनेकांनी सुती रुमालाचा वापर केला. यासह लिंबू सरबत, ताक, लस्सी यावर देखील नाशिककरांनी ताव मारला. (latest marathi news)

Summer Heat
Nashik ZP News : औषध निर्माण अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर

उष्म्यापासून बचावासाठी अशी घ्या काळजी -

- तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या (थंड पाणी टाळा).

- घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.

- सूर्याच्या तीव्र किरणांपासून बचावासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळा.

- हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावे.

- लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.

- अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Summer Heat
Nashik Police Election Duty : पोलिसांवरील ताण झाला हलका! लोकसभा निवडणुकीच्या सततच्या बंदोबस्तामुळे होता तणाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.