Nashik Summer Heat : वाढत्या तापमानामुळे कामकाज असह्य; घरे, बंगलेही तापली

Summer Heat : शहर व परिसरातील वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
The facility has been provided for the protection of the workers on the ongoing sports complex in Sriramnagar area from the sun.
The facility has been provided for the protection of the workers on the ongoing sports complex in Sriramnagar area from the sun.esakal
Updated on

Nashik Summer Heat : शहर व परिसरातील वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असह्य उकाड्यामुळे दैनंदिन कामे अवघड झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर निघायचे न ठरविल्यास घर व बंगलेही तापले आहेत. दुपारी घरात बसणे देखील अवघड होवून बसले असून, उकाडा चांगलाच घाम काढत आहे. उच्चभ्रू व्यक्तींनी वातानुकुलीत यंत्रणा व अन्य उपाययोजना केल्या आहेत. (Nashik Summer Heat Due to increasing temperature work is unbearable in malegaon marathi news)

तथापि, सामान्य नागरीक व मध्यम वर्गीयांसाठी असलेले पंखे, कुलर तोकडे ठरु पाहत आहेत. पंखे गरम हवा फेकत आहेत. एकूणच घरे, आस्थापना व विविध कामाच्या ठिकाणी तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी व उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील अनेक निवासस्थानांना उन्हाच्या किरणांचा प्रभाव कमी करण्यासाठी छतावर डॅमप्रुफ, सफेद रंग, चुना मारण्यात येत आहे.

काही नागरीक छतावर पाणी सोडून देत आहेत. अनेकांच्या छतावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमधील पाणी गरम होत आहे. काही घरे, बंगले, आस्थापनाधारकांनी घरावर व चोहोबाजूला सूर्यकिरणांचा प्रभाव कमी करण्यासाठी शेडनेट जाळी लावलेली आहे. वाढता उकाडा, वृक्षारोपणाचे महत्व वेळोवेळी विषद करीत आहेत.

घरात असलेल्या पाळीव जनावरे प्रामुख्याने कुत्रे, मांजर यांना सांभाळणे अवघड होवून बसले आहे. या पाळीव जनावरांना दुपारी पहुडण्यासाठी ओले बारदान व कपडे टाकून निवाऱ्याची सोय केली जात आहे. भटकी कुत्री गटारीत घुसून पहुडलेली जागोजागी आढळत आहेत. वाढते तापमान पशु पक्षांच्या जीवावर बेतत आहे. (latest marathi news)

The facility has been provided for the protection of the workers on the ongoing sports complex in Sriramnagar area from the sun.
Nashik Summer Heat : आग ओकणाऱ्या सूर्यामुळे पशुपक्षी घायाळ; हिटस्ट्रोक वाढल्याने उन्हापासून करा बचाव

बाजारपेठेत दुपारी अक्षरश: शुकशुकाट असतो. काही व्यापारी, प्रतिष्ठाने दुपारच्या वेळेत बंद असतात. अरुंद गल्लीबोळ व भाजीपाला यासह अन्य बाजारपेठांच्या ठिकाणी ग्राहकांना रस्त्यावरुन चालणे सुलभ व्हावे, उन्हाची झळ व तिरीप लागू नये यासाठी बाजारपेठेत तसेच वाहनांसाठीही हिरवे शेडनेट व पांढऱ्या कापडाच्या आच्छादनाचा वापर होत आहे.

आठवड्यापासून तापमान कायम

खोदकामासह अन्य मेहनतीची व अवजड कामे करणाऱ्यांची अक्षरश: दमछाक होत आहे. ग्रामीण भागात कांदा काढणी व नैमित्तिक भाजीपाला तोडणी वगळता अन्य फारसी कामे नाहीत. ही कामे देखील सकाळी उरकून घेण्याकडे मजुरांचा भर असतो. उघड्यावर काम करणारे बांधकाम कामगारही हवालदील झाले आहेत.

ठेकेदारांना कामगारांना सावलीत काम करता यावे यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. सरासरी ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान शहरवासियांच्या अंगवळी पडले आहे. तथापि येथील तापमानाचा पारा गेल्या आठवड्यापासून सातत्याने ४२ व ४३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने या उपाययोजना करणे व काळजी घेणे आवश्‍यक झाले आहे.

The facility has been provided for the protection of the workers on the ongoing sports complex in Sriramnagar area from the sun.
Nashik Summer Heat: वाढत्या उन्हामुळे शहाळ्यांचे महत्त्व वाढले! किमतीत 2 महिन्यातच दुप्पट वाढ; ग्रामीण भागातूनही मागणी वाढू लागली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.