Nashik Summer Heat : उन्हाच्या तडाख्याने जिवाची काहिली; चिमुरड्यांनी लुटला टँकरच्या रेन डान्सचा आनंद

Summer Heat : थंड वातावरणाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाच्या चटक्याने नाशिककरांच्या जिवाची काहिली होत आहे.
Toddlers enjoying the 'cool' water spray from the tanker pipe on the golf club grounds.
Toddlers enjoying the 'cool' water spray from the tanker pipe on the golf club groundsesakal
Updated on

Nashik Summer Heat : थंड वातावरणाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाच्या चटक्याने नाशिककरांच्या जिवाची काहिली होत आहे. उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळविण्यासाठी विविध प्रकार योजले जात आहेत. असेच काहीसे चित्र बुधवारी (ता.१०) इदगाह मैदानावर दिसून आले. मैदानावरील मातीवर टँकरच्या माध्यमातून पाण्याचा शिडकावाा करण्यात येत असताना उन्हामुळे हैराण झालेल्या काही चिमुकल्यांनी टँकरमधून निघणाऱ्या पाण्याच्या धारेत चिंब होत उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. ()

यंदा शहरात उन्हाचा तडाखा अधिकच जाणवत आहे. सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. जिवाची लाही-लाही होत आहे. उन्हापासून संरक्षण व्हावे. यासाठी नागरिक विविध उपाय अवलंबत आहेत. उन्हापासून बचावासाठी काय करता येईल, ते प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी (ता.११) रमजान ईद असल्याने ईदच्या नमाजसाठी मैदानाची स्वच्छता केली असून मैदानावरील मातीची धूळ उडू नये यासाठी टँकरच्या माध्यमातून मैदानावर पाण्याचा शिडकावा केला जात होता.

Toddlers enjoying the 'cool' water spray from the tanker pipe on the golf club grounds.
Nashik Summer Heat Stroke : नाशिककरांनो उष्माघातापासून सावधान! महापालिकेचा इशारा

यामुळे मात्र मैदानाच्या कुंपणालगत असलेल्या झोपडपट्टीतील चिमुकल्यांनी उन्हाच्या काहिलीपासून बचावासाठी टँकरमागे पळत टँकरमधून निघणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांमध्ये न्हाऊन घेतले. यामुळे त्यांना मिळालेला थंडा-थंडा, कूल-कूलचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मैदानावर स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी तसेच ये-जा करणारे नागरिक त्यांना बघून स्वत:च्या बालपणीचे बिनधास्त दिवस जणू आठवत होते. चिमुकल्यांना मात्र टँकरमधील फवाऱ्यातील उडणारे पाणी सर्वस्वी आनंद देऊन जात होते.

Toddlers enjoying the 'cool' water spray from the tanker pipe on the golf club grounds.
Dhule Summer Heat : वाढत्या उष्णतेमुळे फूलगळतीचे संकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.