मालेगाव : शहर व परिसरात गेल्या दोन दिवसापासून सूर्यदेव पुन्हा आग ओकत आहे. कडक ऊन पडत असल्याने जनजीवन पुन्हा प्रभावीत झाले आहे. मंगळवारी (ता.२१) पारा ४३ अंशावर पोहोचला होता. गेल्या दोन महिन्यात चार दिवसांचा अपवाद वगळता येथे तापमान ४० ते ४४ अंशादरम्यान राहिले आहे.
लोकसभा निवडणुकीत देखील उन्हामुळे फारसा प्रचार झाला नाही. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील मतदानावर देखील उन्हानेच बाजी मारली. मतदारसंघात केवळ ५४ टक्के मतदान झाले. (Nashik Summer Heat Malegaon mercury again at 43 degrees)
येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाने कात टाकली आहे. एप्रिलच्या अखेरीस पारा ४४ अंशावर पोहोचला. मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे चार दिवस तापमान ४० अंशाच्या खाली आले होते. दोन दिवसापासून उन्हाने पुन्हा डोके वर काढले आहे.
मंगळवारी सकाळी दहापासूनच चटके देणारे ऊन पडत होते. दिवसभर उन्हाच्या झळा बसत होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत नागरीक घराबाहेर पडलेच नाहीत. सातत्याच्या उन्हामुळे येथील जनजीवन प्रभावीत झाले आहे. तापमान वाढल्यामुळे उकाडादेखील वाढला आहे. किमान तापमान देखील २५.२ अंश सेल्सिअस आहे. (latest marathi news)
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरीक टोपी, उपरणे, गॉगल घालून घराबाहेर पडत आहेत. कडक उन्हामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. लग्नसाेहळे संपले आहेत. निवडणुकीची रणधुमाळी थांबली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्येही फारशी गर्दी दिसत नाही. रसवंतीगृह मात्र हाऊसफुल आहेत. बर्फगोळे, आईस्क्रीम, कुल्फी, मसाले ताक, लिंबू शिखंजी आदी विक्रेत्यांचा व्यवसाय वधारला असून या व्यावसायिकांसाठी ऊन फायदेशीर ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.