Summer Heat : नाशिककर दिवसाला रिचवतात 12 टन बर्फे; पारा वाढल्याने गारेगार बर्फगोळ्या

Summer Heat : मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोचला असल्याने नाशिककरांची लाहालाही होण्यास सुरवात झाली आहे.
As the summer heats up, the demand for cold ice balls has increased. Girls eating ice balls.
As the summer heats up, the demand for cold ice balls has increased. Girls eating ice balls.esakal
Updated on

Summer Heat : मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोचला असल्याने नाशिककरांची लाहालाही होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बर्फापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे रंगीबेरंगी व गारेगार बर्फ गोळा, ऊसाचा रस, लिंबू सरबत, कोकम, कैरी पन्हे व फळांचा ज्यूस बनवण्यासाठी वापरात येणाऱ्या बर्फाची मागणी कमालीची वाढली आहे. ()

त्यासाठी शहरातील विक्रेत्यांना दिवसाला १२ टन बर्फ लागतो. येत्या काळात या मागणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात पाण्यापासून बर्फ तयार करणारे प्रमुख सहा ‘आईस’ कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यात सकाळी व सायंकाळी दोन टप्प्यात दीड ते दोन टन बर्फ बनतो. साधारणत: ५० किलोच्या बर्फाच्या लादीची किंमत ८०० ते एक हजार रुपये आहे. मागील वर्षी ही किंमत ८०० रुपयांपर्यंत होती. मागणीच्या प्रमाणात दर कमी-जास्त केले जातात.

विशेषतः लग्न सोहळ्याची ऑर्डर असल्यास त्या दिवसाचे दर वेगळे ठरवले जातात आणि ज्यूस, रसवंती किंवा किरकोळ विक्रेत्यांना नियमित दराप्रमाणे बर्फाचा पुरवठा होतो. उन्हाळा सुरु होताच गारेगार कुल्फी, बर्फाचा गोळा, फळांचे ज्यूस आणि उसाचा रस यांच्या मागणीत वाढ होते. हे पदार्थ बनवताना बर्फाचा वापर होतो. त्यामुळे बर्फाच्या मागणीत आपोआप वाढ होते. यासोबतच दुधापासून तयार होणारे ताक, लस्सी आदी पदार्थांच्या मागणीतही वाढ झाल्याचे दिसून येते.

आइसक्यूबला वाढती मागणी

दरम्यान, हॉटेलमध्ये मिळणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेविषयी साशंकता असल्याने आता आईस क्यूबला पसंती वाढलेली दिसून येते. साधारणत: २० ते ५० रुपये किलो दराने हा बर्फ मिळतो. त्यामुळे हॉटेलमध्ये आईस क्यूबला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते. (latest marathi news)

As the summer heats up, the demand for cold ice balls has increased. Girls eating ice balls.
Summer Heat: वाढत्या तापमानाचा दूधाला फटका! उत्पादनात मोठी घट, बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन

लिंबू महागले

उन्हाळ्यात बर्फाबरोबरच लिंबाच्या मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात २० रुपयांना तीन लिंबू मिळतात. तर १० रुपयांना एक मोठा व एक छोटा लिंबू मिळतो. त्यामुळे लिंबू सरबताच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी लिंबाचे प्रमाण कमी वापरले जाते.

''उन्हामुळे उसाच्या रसाला मागणी वाढली आहे. काही लोक बर्फ, लिंबू मिक्स रस पितात. तर काहींना बिना बर्फ रस हवा असतो. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे रस बनवला जातो. मागणीच्या प्रमाणात बर्फाची ऑर्डर देतो. उन्हाळ्यामुळे आता बर्फ जास्त लागत आहे.''-धनंजय कहांडोळ, रसवंती चालक

सरबत प्रकार व प्रतिग्लास (रुपयात)

अननस ज्यूस ४०

उसाचा रस १५ ते २०

चॉकलेट फ्लेवर गोळा २०

गुलाब फ्लेवर गोळा २०

ऑरेंज ४०

कच्ची कैरी ४०

काला खट्टा ४०

अननस मिल्क शेक ४०

गुलाबी ज्यूस ४०

चॉकलेट ज्यूस ४०

लिंबू सरबत २०

मोसंबी ज्यूस ४०

कोकम सरबत २०

कैरी पन्हे ३०

As the summer heats up, the demand for cold ice balls has increased. Girls eating ice balls.
Summer Heat : रसवंतीच्या घुंगरमाळा, लावि रसशौकिनांना लळा! ऊन्हाच्या कडाक्यात वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.