Nashik Summer Heat : उष्णतेमुळे कामगारांकडून कामास नकार; नाशिककर हैराण

Summer Heat : शहर व परिसराचे तापमान ४०.७ अंशापर्यंत टेकल्याने नाशिककरांच्या जिवाची लाही-लाही झाली आहे.
Modern technology cooler fan installed in ABB and Nilay Industries
Modern technology cooler fan installed in ABB and Nilay Industriesesakal
Updated on

Nashik Summer Heat : शहर व परिसराचे तापमान ४०.७ अंशापर्यंत टेकल्याने नाशिककरांच्या जिवाची लाही-लाही झाली आहे. शाळांना सुट्ट्या लागल्या तरी मैदाने पोस्ट पडली असून बैठक खेळांना जोर आला आहे, तर कारखान्यांमध्ये तापलेले पत्र थंड करण्यासाठी अक्षरश कुलर व पंखे लावून कामगारांना काम करावे लागत आहे. उष्णतेमुळे अनेक कारखान्यांमध्ये कामगारांनी पंखे असल्याशिवाय काम करण्यास नकार दिल्याने आधुनिक पद्धतीचे पंखे व कुलर्स लावून काम केले जात आहे. (Nashik Summer Heat Refusal of work by workers due to heat marathi news)

यंदाच्या हंगामात शहराचा तापमानाने विक्रम पातळी गाठली. त्याचे परिणाम सर्वच घटकांना जाणवत आहे. १२ एप्रिलपासून शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्ग हा मैदानावर खेळताना दिसणे अपेक्षित आहे, मात्र उष्णतेच्या झळामुळे विद्यार्थी मैदानापासून दूर आहे. घरांमध्ये बैठा खेळण्याकडे कल दिसून येत आहे. शहरांमध्ये महापालिकेचे जवळपास साडेपाचशे उद्याने आहे. यातील बहुतांश उद्यानांमध्ये मुले खेळायला जात नसल्याने बंद अवस्थेत आहे. संध्याकाळी सातनंतर मुले खेळताना बागडताना दिसतात. (latest marathi news)

Modern technology cooler fan installed in ABB and Nilay Industries
Nashik Summer Heat : ऊन ना तडाखामा पिकं चालनात बळीळ...! अभोणा परिसरात मिरची, टोमॅटो अन कलिंगडाला फटका

कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम

उष्णतेचा परिणाम औद्योगिक वसाहतींमध्ये दिसून येत आहे. सातपूर, अंबड या औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांश कारखाने पत्राचे शेड असलेले आहेत. परिणामी तापलेल्या पत्र्यामुळे काम करताना कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामगारांचा कामावर येण्याचा टक्कादेखील घटला आहे. कामगारांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून आधुनिक पद्धतीचे पंखे व कुलर लावण्याची वेळ आली आहे.

कुलर किंवा पंखे नसेल तर कामगार काम नकार देत असलेल्या तक्रारी नंतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दुपारी बारा ते चार या कालावधीमध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने काही कारखान्यांमध्ये त्या कालावधीसाठी उत्पादनाचे प्रमाण घटविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Modern technology cooler fan installed in ABB and Nilay Industries
Nashik Summer Heat : उन्हाच्या तडाख्याने जिवाची काहिली; चिमुरड्यांनी लुटला टँकरच्या रेन डान्सचा आनंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.