Summer Matka Business : वाढत्या उकाड्याने गरिबांच्या फ्रिजला मागणी! फ्रिजपेक्षा माठातील पाणी आरोग्यास हितकारक

Nashik News : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे सध्या गरिबांचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठाला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
Math for sale on Nashik Pune Road.
Math for sale on Nashik Pune Road.esakal
Updated on

नाशिक रोड : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे सध्या गरिबांचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठाला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ठिकठिकाणी माठ विक्रेत्यांच्या दुकानात गर्दी दिसत असून माठ खरेदीला सर्वच नागरिक पसंती देत आहेत. तर फ्रिजमधील पाण्यापेक्षा माठातील पाणी पिणे आरोग्याला हितकारक असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. (nashik Summer Matka Business increase marathi news)

जिल्ह्यात उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. मालेगावमध्ये उन्हाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर गेला आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातल्या १५ तालुक्यांत उन्हाचे चटके जाणवायला सुरवात झाली आहे. मानवी आरोग्याची तहान भागावी, यासाठी थंड पाण्यास मागणी वाढली आहे. मात्र अति थंड पाणी पिणे आरोग्याला बाधक असून माठाला मागणी वाढली आहे. सध्या नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी माठ विक्रेते यांच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

मातीच्या माठात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. मातीच्या माठाच्या पृष्ठभागावर लहान छिद्रे असतात या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते. बाष्पीभवन प्रक्रियेमुळे पाण्याची उष्णता नष्ट होते. ज्यामुळे पाण्याचे तापमान कमी होते. माठात ठेवलेले पाणी रसायनमुक्त असते.

Math for sale on Nashik Pune Road.
Summer Heat : मालेगावला तापमानाने ओलांडली चाळीशी; राज्‍यात उच्चांकी कमाल तापमानाची नोंद

फ्रिजचे पाणी प्यायल्याने घसा खवखव वाढू शकते. माठातील पाणी घशास हानिकारक नसते. म्हणून लोक माठाला पसंती देतात. यामुळेच माठाला छप्पर फाडके मागणी वाढली आहे. तीनशे ते पाचशे रुपयांत आकारानुसार लोक माठ खरेदी करीत आहेत. माठ विक्रीमुळे विक्रेत्यांचे अर्थकारण सुधारत आहे.

"माठात पानी ठेवल्यास त्यात नैसर्गिक मॅग्नेशिअम, पोटॅशियम ही खनिजे असतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. उष्माघात होण्यापासून बचाव होतो. फ्रिजमध्ये पाणी ठेवल्यावर वीज जळते. मात्र माठ नैसर्गिकरीत्या मोफत पाणी थंड ठेवतो. उन्हाळ्यात सर्वांनी माठातील पाणी पिल्यास आरोग्यास हितकारक राहील."

- डॉ. प्रकाश पुंड, अध्यक्ष नाशिक रोड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

"माठ खरेदीला मागणी वाढली आहे. त्यात लोक काळ्या रंगाच्या माठांना जास्त पसंती देत आहेत. लोक नळ असणारे माठ खरेदी करतात. ऊन वाढल्यामुळे सध्या माठांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे." - जगदीश मिथाप्रा (माठ विक्रेता)

Math for sale on Nashik Pune Road.
Jalgaon Summer Heat : उन्हाची तीव्रता वाढताच जुने कुलर आले बाहेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()