Nashik Onion Rate Hike : उन्हाळ कांदा दराची झेप 4000 रुपये क्विंटलकडे; आवक घटून मागणी वाढल्यामुळे दरात वाढ

Onion Rate Hike : सहा महिन्यांपूर्वीच्या निर्यातबंदीमुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या कांद्याचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत.
Arrival of summer onion in market committee on Monday.
Arrival of summer onion in market committee on Monday.esakal
Updated on

Nashik Onion Rate Hike : सहा महिन्यांपूर्वीच्या निर्यातबंदीमुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या कांद्याचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. उन्हाळ कांद्याची घटलेली आवक व वाढती मागणी यामुळे दराने चार हजार रुपये प्रतिक्विंटलकडे झेप घेतली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता.१२) बाजारभावात तीनशे रुपये प्रतिक्विंटलने वाढ होत कमाल तीन हजार ८६० तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली. ( Summer onion rate hike to Rs 4000 per quintal in district )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.