Nashik News : ‘FLN’ चाचणीमुळे उन्‍हाळी सुटी लांबणीवर; ऐनवेळच्या पत्रकामुळे घोळ

Nashik : उन्‍हाळी सुटी जाहीर होण्याच्‍या ऐन एक दिवसाआधी जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेने साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन) अंतिम चाचणीबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
school holiday
school holidayesakal
Updated on

Nashik News : उन्‍हाळी सुटी जाहीर होण्याच्‍या ऐन एक दिवसाआधी जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेने साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन) अंतिम चाचणीबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्‍यामुळे शाळांच्‍या उन्‍हाळी सुटीचा गोंधळ निर्माण झाला आहे. बहुतांश प्राथमिक स्‍तरावरील शाळांनी शनिवार (ता.१३) पासून उन्‍हाळी सुटी जाहीर केल्‍या असताना विद्यार्थ्यांना चाचणीची तारीख असलेल्‍या २० एप्रिलपर्यंत पुन्‍हा शाळेत बोलविण्याची नामुष्की ओढवणार आहे. (Nashik Summer vacation postponed due to FLN test)

ऐनवेळी घेतलेल्‍या या निर्णयाबाबत शिक्षकांसोबत पालकांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त केला जातो आहे. निपुण भारत अभियान या उपक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन) उपक्रमाच्‍या सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या व सर्व माध्यमाच्‍या इयत्ता पहिली ते तिसरीच्‍या विद्यार्थ्यांची अध्ययन स्‍थिती पडताळणी करण्यात येत असते. याअंतर्गत प्रथम चाचणी ८ ते १० ऑगस्‍ट २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती.

आता जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेने शुक्रवारी (ता. १२) परिपत्रक जारी करताना अंतिम चाचणी २० एप्रिलला घेण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची चाचणी घेण्याबाबत परिपत्रकात नमूद केले आहे. १९ एप्रिलला प्रश्‍नपत्रिका व संकलन प्रपत्र शाळांना त्‍यांच्‍या ई-मेलवर पाठविले जाणार असल्‍याचे परिपत्रकात म्‍हटले आहे.  (latest marathi news)

school holiday
Nashik News : शालेय पुस्तकांचा पुनर्वापर करूया...! ‘टेक्स बुक एक्स्चेंज ड्राईव्ह: रंगूबाई जुन्नरे शाळेचा स्तुत्य उपक्रम

हे प्रपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था यांच्‍या मेलवर पाठविण्याच्‍या सूचनेचा समावेश आहे. यासंदर्भात सर्व प्राथमिक शाळांच्‍या मुख्याध्यापकांना सूचना जारी केलेली आहे. या चाचणीसाठी कोणत्याही वर्ग शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सुट्टी देऊ नये. गैरहजर असलेल्‍या विद्यार्थ्यांना निरोप कळवून २० एप्रिलपर्यंत शाळेत उपस्थित राहाण्यास सांगितले आहे.

विद्यार्थ्यांच्‍या उपस्‍थितीची जबाबदारी मुख्याध्यापक, उपशिक्षकांवर टाकली आहे. दरम्‍यान या परीपत्रकाबाबत बहुतांश शाळा अनभिज्ञ असल्‍याने, यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार शनिवार (ता.१३) पासून बहुतांश शाळांनी उन्‍हाळी सुट्या जाहीर केल्या होत्‍या. अशात आता विद्यार्थ्यांना संपर्क साधताना पुन्‍हा शाळेत बोलाविण्याचे आव्‍हान शालेय प्रशासनासमोर असणार आहे.

इतरही विद्यार्थ्यांच्‍या सुट्या लांबणीवर

तिसरीपर्यंतच्‍या विद्यार्थ्यांची चाचणी होणार असली तरी एकंदरीत सातवीपर्यंतच्‍या विद्यार्थ्यांच्‍या उन्‍हाळी सुट्या लांबणार आहेत. या चाचणीमुळे चौथी ते सातवीपर्यंतच्‍या विद्यार्थ्यांनादेखील शाळेत बोलवतांना उन्हाळी सुट्टीचा अभ्यास देण्याच्‍या सूचना दिल्‍या असल्‍याने त्‍यांनाही आणखी आठवडाभर शाळेत यावे लागणार आहे.

school holiday
Nashik News : रावळगावला चोऱ्यांचे सत्र सुरुच; कृषी साहित्य चोरीने शेतकरी त्रस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.